Goa Politics: भाजपचा उमेदवार प्रचाराचा दणक्यात श्रीगणेशा

Goa Politics: काँग्रेस पक्ष उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार ठरविण्यासाठी चाचपडत असतानाच भाजपने आपल्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारास आज अधिकृतपणे सुरवात केली.
Goa BJP Lok sabha
Goa BJP Lok sabhaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics:

काँग्रेस पक्ष उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार ठरविण्यासाठी चाचपडत असतानाच भाजपने आपल्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारास आज अधिकृतपणे सुरवात केली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे वगळता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पूर्ण मंत्रिमंडळ,

आमदार डॉ. दिव्या राणे वगळता भाजपचे सर्व आमदार, भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या उपस्थितीत पणजीची ग्रामदेवता श्री देवी महालक्ष्मीस श्रीफळ अर्पण करण्यात आले. काँग्रेसने अद्याप दिल्लीतील बैठकीत गोव्याच्या उमेदवारीविषयी विचारच केलेला नाही.

मात्र, उद्या (बुधवारी) दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर विचार होणार, असे सांगण्यात येत आहे. उमेदवारी जाहीर करण्याआधीच काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येते की काय, अशी स्थिती आहे.

Goa BJP Lok sabha
Gadestove 2024: अदृश्य देवता आणि माणसांमधील खेळ

भाजपने प्रचार सुरू करण्याच्या निमित्ताने मंत्री, आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांना एकत्र आणून एक प्रकारे शक्तिप्रदर्शनच केले. विशेष म्हणजे, उत्तर गोवा उमेदवारीसाठी दावेदार असलेले दयानंद सोपटे, दक्षिण गोवा उमेदवारीसाठी दावेदार असलेले ॲड. नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर आणि दामू नाईक हेही या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी प्रचाराची कमान आपल्या हाती घेतल्याचे यावेळी दिसून आले. मंदिर परिसरात भाजपचे सर्व नेते दुपारी साडेतीन वाजताच उपस्थित होते. दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे या 3.40 वाजता पोचल्या. त्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री तेथे आले.

Goa BJP Lok sabha
Goa Road Accident: गोव्यात 2023 मध्ये 2,846 अपघातांची नोंद; दर आठवड्याला पाच जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी 2004 ते 2014 या काळात कॉंग्रेसने काय केले, याची विचारणा जनतेने कॉंग्रेसला करावी, असे आवाहन केले. त्यांनी गोव्यात विविध क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या मदतीचा उल्लेख करताना धारगळमधील आयुर्वेद इस्पितळ तसेच मोती डोंगर आणि वेळगे येथे आयुष इस्पितळ, अखिल भारतीय जलक्रीडा संस्था ही श्रीपाद नाईक यांनी गोव्यात आणल्याचा उल्लेख केला. त्यांनी धेंपे घराणे अनेक समाजोपयोगी कामांशी निगडित असल्याचे नमूद केले.

श्रीपाद यांनी विकसित भारत करण्याची १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी केली आहे, ते काम पुढे नेण्यासाठी उत्तर व दक्षिण गोव्यातून भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले. जगाचे नेतृत्व भारताकडे आल्याने जगभरात भारतीय नागरिकाकडे बघण्याच्या दृष्टीकोन बदलल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com