Goa Road Accident: गोव्यात 2023 मध्ये 2,846 अपघातांची नोंद; दर आठवड्याला पाच जणांचा मृत्यू

Goa Road Accident: ग्रामीण भागात अपघातांची संख्या अधिक असून, एकूण अपघातांपैकी 72.8 टक्के अपघात ग्रामीण भागात झाले आहेत.
Goa Road Accident
Goa Road AccidentDainik Gomantak

Goa Road Accident

गोवा पोलिसांनी गेल्या वर्षभरात झालेल्या अपघातांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ग्रामीण भागात अपघातांची संख्या अधिक असून, एकूण अपघातांपैकी 72.8 टक्के अपघात ग्रामीण भागात झाले आहेत.

गेल्या वर्षी राज्यात 2,846 अपघातांची नोंद झाली, पैकी 2,072 अपघात ग्रामीण भागात झाली असून, केवळ 774 अपघात शहरी भागात झाले आहेत.

ग्रामीण भागात झालेल्या अपघातांमध्ये 214 जणांचा बळी गेला असून, शहरी भागातील अपघातात 76 जणांनी जीव गमावला आहे. वर्षभरात 272 गंभीर अपघातात 300 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सर्वाधिक अपघात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत झाल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर 95 टक्के अपघात दिवसाच्या लख्ख प्रकाशात झाले असून, 40 टक्के अपघात रहिवासी भागात झाले आहेत.

Goa Road Accident
Panaji Smart City: प्रदूषण, सुरक्षा आणि मुदत पालन करण्यासाठी काय केले? 'स्मार्ट सिटी'बाबत सरकारला न्यायालयात द्यावे लागणार उत्तर

2022 च्या तुलनेत गोव्यात एकूण अपघातांची संख्या घटली असली तरी, मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अपघातांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. 2023 च्या आकडेवारीनुसार, दर आठवड्याला पाच जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला यातील 70 टक्के मृत्यू दुचाकी वाहनांचा समावेश होता. 2022 मध्ये 3,011 अपघातांची नोंद झाली होती.

दरम्यान, गेल्या वर्षी बाणस्तारी येथील पुलावर झालेल्या मर्सडीज कारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले होते. यावेळी मर्सडीजचा चालक श्रीपाद सिनाई सावर्डेकर उर्फ ​​परेश मद्याच्या नशेत असल्याचे समोर आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com