BJP 46th Foundation Day: 'कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष'-CM सावंत; गोव्यात भाजपचा स्थापन दिन उत्साहात साजरा

Goa CM Pramod Sawant On 46th Foundation Day: भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाल्यानंतर अवघे दोन खासदार असलेल्या पक्षाने केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर जगातील सर्वात मोठा पक्ष बनण्याची झेप घेतली.
Goa CM Pramod Sawant On 46th Foundation Day
Goa CM Pramod Sawant On 46th Foundation DayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाल्यानंतर अवघे दोन खासदार असलेल्या पक्षाने केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर जगातील सर्वात मोठा पक्ष बनण्याची झेप घेतली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्र प्रथम ही भावना ठेवून काम केले, त्यामुळे देशाला दहा वर्षात विकासाच्या मार्गावर आणता आले, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज (6 एप्रिल) सांगितले.

46वा स्थापना दिन

भारतीय जनता पक्षाच्या 46व्या स्थापना दिनाच्यानिमित्ताने रविवारी पणजीतील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्थापना दिनानिमित्त प्रथम मुख्यमंत्र्यांनी कार्यालयात पक्षाचा ध्वज फडकावला, याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार श्रीपाद नाईक, आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार रुडाल्फ फर्नाडिस, आमदार राजेश फळदेसाई यांच्यासह इतर मान्यवरांनी हजेरी लावली. ध्वजारोह‌नानंतर पक्ष कार्यालयात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Goa CM Pramod Sawant On 46th Foundation Day
Goa CM Pramod Sawant: गोव्याच्या इतिहासात प्रमोद सावंत यांनी नोंदवला अनोखा विक्रम! मुख्यमंत्रीपदाची सलग सहा वर्षे केली पूर्ण

मुख्यमंत्री सावंत म्हणाले

सावंत म्हणाले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे ब्रिदवाक्य भाजपचे (BJP) कार्यकर्ते विसरलेले नाहीत, अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठीच आम्ही राजकारण करतो. 1951 साली त्यांनी जनसंचाची स्थापना केली आणि पुढे भाजप या पक्षाची निर्मिती झाली. 2047 मध्ये देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देश जगातील सर्वात विकसित देश असेल.

काँग्रेसचे केवळ कुटुंबासाठीच काम

नाईक खासदार नाईक म्हणाले की, देशात सर्वात जास्त काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाने केवळ स्वहित आणि एकाच कुटुंबासाठी काम केले. निवडणुका आल्यानंतर केवळ सत्तेवर कसे येऊ हेच त्यांनी पाहिले. गेल्या अकरा वर्षात भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली देशाची जी प्रगती झाली आहे, हे सर्व देश पाहत आहे. भाजप हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. बहुमत असूनही इतर मित्र पक्षांनाही घेऊन भाजप सरकार चालवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Goa CM Pramod Sawant On 46th Foundation Day
Goa CM Pramod Sawant: कर्नाटकात लय जबरा फसले सीएम सावंत; अचानक हॉटेलची लिफ्ट बंद झाल्यानं उडाली भांबेरी

बाबूश अनुपस्थित

भाजपच्या स्थापनादिनानिमित्त पणजीतील पक्ष मुख्यालयातील कार्यक्रमास तिसवाडीतील आमदारांना निमंत्रण होते. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, सांताक्रूझचे रुडॉल्फ फर्नांडिस, कुंभारजुवेचे राजेश फळदेसाई हे उपस्थित होते. मात्र, अनुपस्थिती होती ती पणजीचे आमदार बाबूश मोन्सेतत यांची. बाबूश गोव्याबाहेर असल्याने कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, असा निर्वाळा प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी दिला, मात्र काहीवेळाने मिरामार येथील त्यांच्या खासगी कार्यालयात बाबूश यांनी स्थापनादिन साजरा केला. यामुळे पक्ष कार्यालयातील बाबूश यांची अनुपस्थिती चर्चेचा मुद्दा बनला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com