Bits Pilani: आतापर्यंत 4 जीव गेले, अजून किती हवे? ‘बिट्स पिलानी’तील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस आक्रमक

Bits Pilani Student Death: विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व सकारात्मक रहावे यासाठी योगवर्ग तसेच डायलेक्टिकल बिहेवियर थेरपी (डिबीटी) सुरू करावी अशी सूचना करण्यात आली.
Bits Pilani
Bits PilaniDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पस्‌मधील विद्यार्थ्यांच्या वाढत्‍या मृत्‍यूंबाबत चिंता व्‍यक्त करून काँग्रेस नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी वेर्णा पोलिस व बिट्स पिलानी कॅम्पसमधील जनसंपर्क अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. गेल्या आठ महिन्यांत चार विद्यार्थ्यांचा मृत्‍यू झाला आहे.

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व सकारात्मक रहावे यासाठी योगवर्ग तसेच डायलेक्टिकल बिहेवियर थेरपी (डिबीटी) सुरू करावी अशी सूचना करण्यात आली.

यासंबंधी आम्ही लवकरच बिट्स पिलानी कॅम्पस्‌ला पुन्हा भेट देऊन निवेदन देणार आहोत तसेच सविस्तर संकल्पना मांडणार आहोत, असे प्रदेश काँग्रेस समितीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष नितीन चोपडेकर यांनी सांगितले.

Bits Pilani
Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

बिट्स पिलानी कॅम्पस्‌मध्ये सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी असून मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी २२ हॉस्टेल्‍सची सोय आहे. तेथेही सुमारे ७०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ज्या-ज्या सूचना करण्यात आल्या, त्यानुसार पावले उचलण्यात आली आहेत.

- अर्जुन हळर्णकर, जनसंपर्क अधिकारी (बिट्‌स पिलानी)

Bits Pilani
Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

बिट्स पिलानी कॅम्पस्‌मध्‍ये यापूर्वी तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कॅम्पस्‌च्या बाहेर, झुआरीनगर आदी परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी.

- नितीन चोपडेकर, अध्‍यक्ष (प्रदेश काँग्रेस समिती ओबीसी विभाग)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com