Press Conference Goa Pradesh Mahila Congress
Press Conference Goa Pradesh Mahila CongressDainik Gomantak

Goa Pradesh Mahila Congress : ‘मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजने’वर महिला काँग्रेसचा तीव्र आक्षेप : बीना नाईक

खासगी बँकेत खाते उघडण्यामागील हेतू काय?
Published on

भाजप सरकारच्या ‘मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजने’वर महिला प्रदेश काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसलेल्या ॲक्सिस बँकेत खाते उघडण्यास संस्थांना सांगण्यामागील सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

त्याशिवाय या बँकेच्या उच्च पदावर भाजप नेत्याची पत्नी का? असा सवाल करीत महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी भाजप या योजनेद्वारे आपला प्रचार करीत असल्याचा आरोप केला.

काँग्रेस भवनात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष रेणुका देसाई, सरचिटणीस सई वळवईकर, पी. रापोज आणि पणजी महिला गटाध्यक्ष लेविनीया डिकॉस्ता उपस्थित होत्या.

Press Conference Goa Pradesh Mahila Congress
Dabolim Airport : दाबोळीवर प्रवाशाचा प्रताप; 179 विमान प्रवाशांचा जीव लागला होता टांगणीला!

नाईक म्हणाल्या, ॲक्सिस ही खासगी क्षेत्रातील बँक आहे. सरकार कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून करण्यास प्राधान्य देते, परंतु भाजप नेत्याची पत्नी ॲक्सिस बँकेत उच्च पदावर असल्याने तिला खूष करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे का? अचानक जुनी परंपरा बदलून सरकार खासगी क्षेत्रातील बँकेवर कसा काय विश्वास ठेवत आहे, असा सवालही त्यांनी केला.

‘मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना’ जी अनुदानित शाळांसाठी राबविण्यात येणार आणि त्यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून न करता, खासगी बँकेद्वारे आणि तेही ऑनलाईन पद्धतीने करणे चुकीचे आहे.

Press Conference Goa Pradesh Mahila Congress
Electricity Bill Hike: राज्यातील वीज ग्राहकांना 'शॉक'; दरात 5 टक्क्यांनी वाढ

राज्य सरकारचा छुपा अजेंडा?

अगोदरच देशातील बँका 28 जणांनी लुटलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. बँका लुटणाऱ्यांनी दहा हजार कोटींहून रक्कम लंपास केली आहे, तरीही त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही. भाजपने काळा पैसा देशात परत आणण्याचे व प्रत्येक भारतीय नागरिकांच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते, हे आश्‍वासन कुठे गेले आणि ते पंधरा लाख रुपयेही कुठे गेले? मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजनेमागे सरकारचा कोणता छुपा अजेंडा आहे? असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com