Electricity Bill Hike: राज्यातील वीज ग्राहकांना 'शॉक'; दरात 5 टक्क्यांनी वाढ

राज्याच्या वीज विभागाने वीज दरात 5.2% वाढ अधिसूचित केली आहे.
Electricity Bill Hike in goa
Electricity Bill Hike in goaDainik Gomantak

Electricity Bill Hike: राज्याच्या वीज विभागाने वीज दरात 5.2% वाढ अधिसूचित केली आहे. दरांमधील सुधारणांना संयुक्त विद्युत नियामक आयोगाने (JERC) मार्चमध्ये मंजुरी दिली होती. वीज दरातील सरासरी वाढ 1 एप्रिलपासून लागू आहे आणि जोपर्यंत दुरुस्ती किंवा ही दरवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत ती लागू राहील, असे शनिवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

Electricity Bill Hike in goa
Ponda Municipal Council Election Result 2023 : खुल जा सिम सिम : उमेदवारांची उत्‍सुकता शिगेला

वाढतच जाणारे सुधारित वीज दर 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आहेत. माहितीनुसार, कोविड-19 महामारीनंतरची ही दुसरी वीजदर वाढ आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, ग्राहक आणि विरोधी पक्षांनी सरकारी योजनेवर टीका केली असतानाही, महसुलातील तफावत भरून काढण्यासाठी राज्य सरकारने वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला होता, असे सांगण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले होते की सरकारने महसूल वाढवण्यासाठी इतर स्त्रोतांचा वापर केला पाहिजे आणि वीज गळती रोखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

उच्च दाबाची वीजही महागली

यापूर्वीची वीज दरवाढ लक्षात घेता गेल्या वर्षभरात खात्याने 5 ते 6 टक्के वीज दरवाढ केली आहे. उच्च दाबाची वीजही महागली असून उद्योजकांनाही त्याचा फटका बसणार आहे. वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस म्हणाले की, एप्रिल 2023 पासून नव्या वीज दरवाढीप्रमाणे ग्राहकांना बिले देण्यात येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com