Dabolim Airport : दाबोळीवर प्रवाशाचा प्रताप; 179 विमान प्रवाशांचा जीव लागला होता टांगणीला!

आपत्कालीन दरवाजाचे हॅण्डल खेचल्याने तांत्रिक बिघाड
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा-चंदीगढ व्हाया हैदराबाद इंडिगो फ्लाईटमधील प्रवाशाने दाबोळी विमानतळावर अचानक विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन तब्बल 179 जणांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, विमानातील क्रू मेंबरने शिताफीने हे प्रकरण हाताळल्याने मोठे संकट टळले.

दाबोळी विमानतळावरील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, (ता. ५) दुपारी ३ वाजता ही घटना विमानतळावर घडली. गोवा-चंदीगढ व्हाया हैदराबादमार्गे जाणाऱ्या विमानातील प्रवासी विशाल शांडिल्य (वय २८, रा. हिमाचल प्रदेश) याने अचानक आपत्कालीन दरवाजाचे हॅण्डल खेचल्याने विमानात तांत्रिक बिघाड निर्माण होऊन क्रू मेंबर्ससह १७९ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

Dabolim Airport
Electricity Bill Hike: राज्यातील वीज ग्राहकांना 'शॉक'; दरात 5 टक्क्यांनी वाढ

आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. हा प्रकार क्रू मेंबरच्या लक्षात येताच त्याने त्या प्रवाशाला रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता.

कारण अस्पष्ट

प्रवासी विशाल शांडिल्य याने अचानक आपत्कालीन दरवाजाचे हॅण्डल का खेचले, असे करण्यामागे त्याचा कोणता उद्देश होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी विशाल शांडिल्य याच्याविरुद्ध भादंस कलम ३३६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष गावकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Dabolim Airport
Goa HSSC Result 2023 : यंदा बारावीचा निकाल वाढला दोन टक्क्यांनी

अन् प्रवाशांचा जीव भांड्यात

विशाल शांडिल्य याने अचानक आपत्कालीन दरवाजाचे हॅण्डल खेचल्याने विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. मात्र, क्रू मेेंबरच्या सजगतेमुळे हा प्रकार लगेच लक्षात आला. तोपर्यंत विमान थांबवल्याने प्रवाशांत घबराट निर्माण झाली होती.

अखेर क्रू मेंबरने हा प्रकार तात्काळ हाताळल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. या प्रकरणी शानवा शेख यांनी विमानतळ पोलिस स्थानकावर तक्रार नोंदवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com