Bhoma Old Goa 4-laning: "भोम चौपदरीकरणात एकही घर, मंदिराला धोका नाही" मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Four lane Road Bhoma: भोम गावातून जाणाऱ्या नियोजित चौपदरी रस्ता कामात एकही घर किंवा मंदिराला धोका पोचणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मधलावाडा - भोम येथील नागरिकांना दिली

फोंडा: भोम गावातून जाणाऱ्या नियोजित चौपदरी रस्ता कामात एकही घर किंवा मंदिराला धोका पोचणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मधलावाडा - भोम येथील नागरिकांना दिली. आज शनिवारी (दि. १९) या गावातील सुमारे पन्नास नागरिक मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साखळी येथे रवींद्र भवनात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिले.

केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाने भोम ते खोर्लीपर्यंतच्या चौपदरी रस्ता बांधकामासाठी १,०६० कोटी रुपये मंजूर केले असून पावसाळ्यानंतर या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. या कामावेळी सटी देवस्थान तसेच इतर घरांना धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांत व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur Mega Project Protest
Goa begging problem
CM Pramod Sawant Water Metro Presentation
Guirim River Project
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com