Goa Police Vacancies: गोवा पोलिसात 'DSP'ची तब्बल 58 पदे रिक्त! 'खाकी'वर वाढला कामाचा ताण; सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

58 Deputy Superintendent Posts Vacant Goa: गोवा पोलिस दलातील उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या कमतरतेकडे गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
58 Deputy Superintendent Posts Vacant Goa
Goa Police VacanciesDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोवा पोलिस दलातील उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या कमतरतेकडे गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून उपअधीक्षकांची ५८ पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

या मनुष्यबळाच्या कमतरतेचा राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा सरदेसाई यांनी दिला आहे. गोवा पोलिस दलातील सध्याची आकडेवारी मांडताना त्यांनी सांगितले की, उपअधीक्षकांची एकूण ७० पदे मंजूर असून त्यापैकी केवळ १३ पदे भरलेली आहेत.

58 Deputy Superintendent Posts Vacant Goa
Goa Police: गोवा पोलिस दलात आतापर्यंतचे मोठे फेरबदल; IPS अधिकाऱ्यांसह 12 महत्वाच्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

तब्बल ५८ पदे रिक्त असल्याने पोलिस खात्याची पर्यवेक्षकीय रचना मोठ्या दबावाखाली आली आहे. पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया रखडल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com