Bandoda villagers Oppose IIT Project: आयआयटीला बांदोडावासीयांचा विरोध; अन्यथा न्यायालयात जाणार, ग्रामसभेत निर्धार, 'कलम 39 अ' वरही चर्चा

IIT Project In Katamgaldada: राज्यात इतर ठिकाणी आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी तीव्र विरोध झाल्यानंतर शेवटी फर्मागुढीतील जमिनीचा पर्याय ठेवण्यात आला.
IIT Project In Katamgaldada
Bandoda villagers Oppose IIT ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: बांदोडा पंचायत क्षेत्रातील कटमगाळदादा परिसरातील नियोजित आयआयटीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून फर्मागुढीचा परिसर राखून ठेवण्याबरोबरच कटमगाळदादाच्या वास्तव्याला कोणतीही आडकाठी येऊ देणार नाही, असा निर्धार करीत बांदोडावासीयांनी आजच्या ग्रामसभेत आयआयटीला विरोध दर्शविला.

यावेळी सरपंच, उपसरपंच आणि इतर पंचसदस्यांनीही ग्रामस्थांना समर्थन दर्शविले. या ग्रामसभेत नियोजित आयआयटी प्रकल्प आणि नगरनियोजन खात्याचे कलम ३९ अ हे दोन विषय प्रामुख्याने चर्चेला आले. त्यात दोन्ही विषयांना धरून चर्चा झाली असता ग्रामस्थांनी तीव्र विरोध करून आवश्‍यक ठराव संमत करण्यात आले.

IIT Project In Katamgaldada
Goa Court Cases Pending: राज्‍यात 272 खटले 30 वर्षांपासून प्रलंबित; कनिष्‍ठ न्‍यायालयांतील 63,560 खटल्‍यांचा अजूनही निकाल नाही

राज्यात इतर ठिकाणी आयआयटी प्रकल्प उभारण्यासाठी तीव्र विरोध झाल्यानंतर शेवटी फर्मागुढीतील जमिनीचा पर्याय ठेवण्यात आला. सध्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात आयआयटी सुरू असून कायमस्वरूपी मोठी जागा आयआयटीसाठी उपलब्ध व्हावी, यासाठी फर्मागुढीचा परिसर आयआयटीसाठी योग्य असल्याचा निष्कर्ष सरकारने काढून फर्मागुढीचे नाव केंद्र सरकारला सुचविले आणि ते मान्यही करण्यात आले.

फर्मागुढीच्या परिसरात कटमगाळ दादाचे वास्तव्य त्यातच फर्मागुढीच्या परिसरात जैवविविधता असल्याने स्थानिकांनी आयआयटीला विरोध करीत हा प्रकल्प हद्दपार करण्याची जोरदार मागणी केली. फर्मागुढीत सध्या गृहनिर्माण महामंडळाच्या जागेत वास्तव्यास असलेल्या लोकांनी कूपनलिका खोदल्याने त्याचा परिणाम सखल भागात असलेल्या बांदोडावासीयांना होत असून या प्रकरणाची चौकशी करावी आणि आयआयटी प्रकल्प या ठिकाणी आल्यास मोठ्या प्रमाणात येथील पाणी उपसा होऊन बांदोडावासीय पाण्यासाठी वंचित होतील, असे ग्रामसभेत सांगण्यात आले.

IIT Project In Katamgaldada
Karnataka High Court: पुराव्यांचा विचार करत कोर्टाचा मोठा निर्णय! माजी आमदार लवू मामलेदार मृत्यू प्रकरणातील संशयिताची याचिका फेटाळली

सद्यस्थितीत आयआयटीच्या विरोधाचा ठराव संमत झाला आणि आवश्‍यक झाल्यास न्यायालयीन लढाईही करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. नगर नियोजन खात्यातील क्लिष्ट ३९अ कलम त्वरित रद्द करण्याचा ठरावही या ग्रामसभेत घेण्यात आला. या कलमामुळे गोमंतकीयांना जमीनच शिल्लक राहणार नसून डोंगर कापून आणि निसर्गाची हानी करून मोठमोठे निवासी प्रकल्प उभे राहतील, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त करून हे कलमच रद्द करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामसभेत सोपो कराचाही विषय चर्चेला आला.

सोपो करात घोटाळा झाला असून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामसभेत ॲड. सुरेल तिळवे, दिनेश गावणेकर, गुरुदास नाईक तसेच इतरांनी आपले विचार व्यक्त केले. सरपंच चित्रा फडते यांनी स्वागत केले. पंचायत सचिव कृष्णा गावडे यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केल्यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली. पंचमंडळही ग्रामस्थांसमवेत... फर्मागुढी येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाला बांदोडा पंचायत मंडळानेही विरोध केला असून पंचमंडळ ग्रामस्थांसमवेत असल्याचे या ग्रामसभेत जाहीर करण्यात आले. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com