
मडगाव: गोव्यात सहा तालुक्यात शिवशाही होती. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यातील धर्मांतरणाला चाप बसला हा सांगितलेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलेला इतिहास चुकीचा असल्याचे मत कोकणी लेखक उदय भेंब्रे यांनी मांडले होते. यावरुन आता बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी भेंब्रे यांच्या घराबाहेर शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) रात्री निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.
लेखक उदय भेंब्रे यांच्या बोर्डा - मडगाव येथील घराबाहेर बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले असून, भेंब्रे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. बजरंग दलाचे राज्य संयोजक विराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते भेंब्रे यांच्या घराबाहेर एकत्र झाले आहेत.
भेंब्रे यांनी गुरुवारी त्यांच्या युट्युब चॅनेलवरुन एक व्हिडिओ प्रसिद्ध करत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाही आणि धर्मांतरण याबाबत केलेली वक्तव्य खोडून काढत, सावंत यांनी सांगितलेला इतिहास खोटा असल्याचे म्हटले होते.
उदय भेंब्रे यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यातील शिवभक्तांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, आज (शुक्रवारी) बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भेंब्रे यांच्या घरासमोर एकत्र येत निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. भेंब्रे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी बजरंग दलाचे कार्यकर्ते करतायेत.
भेंब्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांनी कथन केल्याप्रमाणे राज्यात शिवशाही नव्हती तसेच, शिवरायांमुळे धर्मांतरण थांबले असे नाही, असे वक्तव्य काही पुस्तक आणि इतिहास लेखकांचा आधार घेऊन केले होते.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या राजकीय फायद्यासाठी अशी वक्तव्य करतायेत, तसेच इतिहास सांगण्यापूर्वी थोडा अभ्यास केला असता तर बरे झाले असते, असा आरोप उदय भेंब्रे यांनी केला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेला दाव्याला इतिहासात कोणताही सबळ आधार नाही किंवा तसे इतिहास कोठे नमूद केले नसल्याचेही भेंब्रे यांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.