Vasco: 'पुन्हा येऊनच दाखवा, मार खाल', BJP आमदार आमोणकर वीज खात्याचे कार्यकारी अभियंता यांच्यात जुंपली Video Viral

Vasco News: दोन दिवसांत तेथे पोलिस संरक्षणात कामास प्रारंभ करणार असल्याचे काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले.
BJP MLA sankalp Amoankar Threatens Electricity Dept Engineer
BJP MLA sankalp AmoankarDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: बोगदा येथील वीज खात्याच्या वसाहतीतून जाणारी वाट बंद करण्यावरून मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व वीज खात्याचे कार्यकारी अभियंते काशिनाथ शेट्ये यांच्यामध्ये शुक्रवारी (ता. २८) मोठा वाद निर्माण झाला.

याप्रकरणी आमोणकर यांनी शेट्ये यांना 'तेथे पुन्हा येऊनच दाखवा, तेथील रहिवाशांकडून मार खाल' असा इशारा दिला. तर तेथील काही स्थानिकांनी आपल्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी आपण संबधितांविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल करणार आहे. तसेच आपण दोन दिवसांत तेथे पोलिस संरक्षणात कामास प्रारंभ करणार असल्याचे काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले.

येथे पाहा व्हि़डिओ

BJP MLA sankalp Amoankar Threatens Electricity Dept Engineer
Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! शिमग्याच्या तोंडावर पुन्हा धावणार सावंतवाडी पॅसेंजर आणि दादर-रत्नागिरी ट्रेन

आमोणकर यांनी संताप व्यक्त करताना शेट्ये यांना सेवेतून निलंबित नव्हे, तर बडतर्फ करण्याची गरज व्यक्त केली. ते सरकारी अधिकारी म्हणून काम करीत नसून एक 'एक्टिविस्ट' म्हणून काम करीत असल्याचा आरोप केला.

बोगदा येथील वीज खात्याच्या वसाहतीतून ये-जा करण्यासाठी वाट आहे. ती वाट बंद करण्यासाठी शेट्ये व इतर अधिकारी, कर्मचारी तेथे जेसीबी घेऊन सकाळी आले होते. त्यांनी ती वाट बंद करण्याचा प्रयत्न केल्यावर तेथील स्थानिकांना विरोध केला. त्यानंतर त्यांनी आमदार आमोणकर यांना कळविले.

BJP MLA sankalp Amoankar Threatens Electricity Dept Engineer
Ghaziabad To Goa Flight: आता दिल्लीला जायची गरज नाही; 01 मार्चपासून हिंडन ते गोवा सुरु होणार थेट विमानसेवा

आमोणकर घटनास्थळी आल्यावर त्यांनी शेट्ये यांना काम थांबविण्याची सूचना केली. तथापी, रहिवाशांसाठी चार वाटा आहेत, त्यापैकी दोन वाटा बंद करतो, असे शेट्ये यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com