गोव्यातील विधानसभा निवडणुका मुदतीपूर्वी घेतल्या जाणार नाही

भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी फेब्रुवारी 2022 नंतरच गोव्यातील विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील, असे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज सांगितले.
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत Dainik Gomantaak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील (Goa) विधानसभेच्या निवडणुका (Assembly election) मुदतीच्या पूर्वी घेतल्या जाणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने (BJP) निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी फेब्रुवारी 2022 नंतरच गोव्यातील विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी आज पणजी (Panajim) येथे केले. येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिपादन केले. (Assembly elections in Goa will not be held before the deadline)

भारतीय जनता पक्ष हा नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना सक्रीय ठेवत असतो. निवडणुका केव्हाही झाल्यातरी पक्ष तयारच असतो. मात्र सरकार म्हणून फेब्रुवारी नंतरच निवडणुका घेण्यात येणार आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत
Goa Election: भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

खाण महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झालेले असून राज्यपालांची खाण महामंडळाच्या स्थापनेच्या विधेयकाला मान्यता मिळाल्यानंतर सदर प्रक्रिया पुढे जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी या विषयीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

दरम्यान राज्यातील महाविद्यालय व शिक्षण संस्थांनी फक्त कला व वाणिज्य या विषयाचे पदवीधर तयार करण्याकडेच भर न देता कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करून प्रत्येक महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी स्वयंपूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यानी आज केले.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत
Goa: मुख्यमंत्र्यांनी साधला मडगाव भाजप कार्यकर्त्यांकडे संवाद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com