Goa Election: भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपचेच सरकारसत्तेवर येणार असून, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे Dainik Gomantak

डिचोली: आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) राज्यात (Goa) भाजपचेच सरकार (BJP Government) सत्तेवर येणार असून, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. असा संदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी साखळी मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. साखळी (Sanquelim)मतदारसंघात भाजपच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे. असे आवाहनही त्यांनी केले. (Goa Assembly elections: BJP state president Sadanand Shet Tanawade tour on Sanquelim)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि इतर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि इतरDainik Gomantak

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल मंगळवारी साखळी मतदारसंघाचा दौरा करून मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. साखळीचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आमोणे येथून सदानंद शेट तानवडे यांच्या दौऱ्याची सुरवात झाली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे
Goa : रोजगार हिच डोंगराएवढी समस्या

यावेळी आमोणेची सरपंच सलीया गावस, कृष्णा गावस आणि इतर पंच तसेच साखळी भाजप मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, कालिदास गावस, प्रदेश समितीचे सुभाष मळीक, हरवळेचे सरपंच संजय नाईक आदी भाजपच्या महिला, युवा आणि विविध मोर्चा समितींचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. आमोणे येथे कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे स्वागत केले. श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यानंतर दौऱ्याला सुरवात झाली. श्री. तानावडे यांनी आमोणे, विर्डी, न्हावेली, कुडणे, हरवळे, सुर्ल, वेळगे, पाळी या पंचायतीसह साखळी पालिका क्षेत्राचा दौरा केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे
Goa : काणकोणात ऑगस्टचे रेशन रखडले

भाजप मंडळ, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अनुसुचित जाती जमाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, महिला मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच बूथ समिती कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यावेळी विविध पंचायतीचे सरपंच, पंच तसेच नगरसेवकांचा सहभाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com