Fatorda: जसजशी गोव्याची विधानसभा निवडणुक (Goa Assembly Election 2022) जवळ येत आहे तस तशी राजकीय पक्षांची नेते मंडळी कार्यकर्त्यांना एकत्रीत आणण्याच्या प्रयत्नांत लागली आहे, त्याचाच एक भाग म्हणुन सोमवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी दक्षिण गोवा जिल्हा भाजप कार्यालयात (South Goa BJP) येऊन मडगावमधील (Margao) कार्यकर्त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व त्यांचे निरसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले. (Goa)
या संवाद भेटीत हजर असलेल्या 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांकडे त्यांनी वन टू वन संवाद साधला. एरव्ही कार्यकर्ते पणजीत जाऊन त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडत. पण आता स्वता: मुख्यमंत्री कार्यकर्त्यांपर्यंत त्यांच्याच शहरात किंवा गावात येऊन भेटणार आहेत असे भाजप मडगाव मंडळातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
आता दर 15 दिवसांनी किंवा महिन्याने मुख्यमंत्री राज्यातील वेगवेगळ्या शहरे व गावांमध्ये जाऊन कार्यकरत्यांना भेटणार आहेत असेही त्याने सांगितले. मडगावच्या संवाद भेटीत नेमके कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे जरी जाहीर झालेले नसले तरी मडगाव भाजप मंडळातील मतभेद दूर करण्याचे तसेच निवडणुकीत मडगाव मधील उमेदवाराची चाचपणी करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे कळते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.