Crypto Currency Racket: 'सायबर स्लेव्ह'चा शिकार ठरलेल्या आशिषची अखेर सुटका! वाचा अंगावर शहारा आणणारी घटना

Crime News: थायलंडला गेलेल्‍या राय येथील आशिष वाघ या युवकावर तब्‍बल दोन महिने ‘सायबर स्लेव्ह’ म्‍हणून ओलीस रहाण्‍याची पाळी आली.
Crypto Currency
Crypto CurrencyDainik Gomantak
Published on
Updated on

आपल्‍याला थायलंडमध्‍ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार आणि आपला संसार त्‍यामुळे रुळावर येणार, या आशेने थायलंडला गेलेल्‍या राय येथील आशिष वाघ या युवकावर तब्‍बल दोन महिने ‘सायबर स्लेव्ह’ म्‍हणून ओलीस रहाण्‍याची पाळी आली. तुझी सुटका व्‍हायला हवी, तर घरच्‍यांना पैसे पाठवायला सांग. अन्‍यथा तुझी येथून सुटका नाही, असे धमकावत त्‍याला रोज मारहाण केली जात होती.

म्‍यानमार येथील ‘नो मॅन्‍स लँड’मध्‍ये एका ठिकाणी डांबून ठेवलेल्‍या आशिष वाघ याची सुटका करून त्‍याला सोमवारी गोव्‍यात आणले. मायणा-कुडतरी पोलिसांनी त्‍याची जबानी नोंदविण्‍यास सुरुवात केली असून त्‍यात त्‍याने आपल्‍यावर कसला प्रसंग त्‍या दोन महिन्‍यात ओढवला याची माहिती दिली. त्‍याला एवढी मारहाण झाली होती की, पोलिसांना जबानी देण्‍याच्‍याही अवस्‍थेत नव्‍हता. त्‍यामुळे काल बुधवारी त्‍याची पुन्‍हा जबानी नोंदवून घेण्‍याचे ठरविले होते. मात्र, त्‍याचे अंग ठणकत असल्‍यामुळे तो पोलिस स्‍थानकावर येऊ शकला नाही, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

Crypto Currency
Goa Fraud Case: पुण्याच्या ‘एनव्‍हे इनोव्‍हेंचर्स’ लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका; गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आदेश

नोकऱ्यांच्या नावाखाली भारतीयांची फसवणूक करून त्यांना ‘सायबर स्लेव्ह’ बनवण्याची अनेक प्रकरणे म्यानमार, थायलंड, लाओस आणि कंबोडियामध्ये अलीकडेच उघडकीस आली. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालय आणि लाओसमधील भारतीय दुतावासाने यात अडकलेल्या तब्बल ४७ तरुणांची सुटका केली आहे. यात आशिषचाही समावेश आहे. गलेलठ्ठ पगाराची डेटा एंट्रीची नोकरी असल्याचे सांगत परदेशी बोलावून त्यास ‘क्रिप्टो स्कॅम’मध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची वाच्यता व्हॉटसॲप कॉलमुळे झाली.

प्राप्त माहितीनुसार, आशिष वाघ नोकरीच्‍या शोधात होता. कुणीतरी त्‍याला मडगावातील जुन्या मार्केटजवळ रहाणाऱ्या हेजल फर्नांडिस या युवतीशी गाठ घालून दिली. तिने त्‍याला थायलंडमध्‍ये नोकरी असल्‍याचे सांगून एका आठवड्याच्‍या आत तुला तेथे जावे लागेल, असे सांगून त्‍याच्‍याकडून ३० हजार रुपये घेतले आणि नंतरचे आपले पैसे तुझ्‍या पगारातून कापून घेऊ असे सांगत त्‍याला थायलंडला पाठविले.

थायलंडला त्‍याला घेऊन जाण्‍यास एक मुस्‍लीम व्‍यक्‍ती आली होती. त्‍याने त्‍याला म्यानमारमध्ये नेऊन सोडले. पुढे येथे कार्यरत असणाऱ्या मोठ्या संघटित टोळीच्या ताब्यात त्याला देण्यात आले. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला व त्यास फेक प्रोफाईल बनवून क्रिप्टो स्कॅममध्ये गुंतवण्यात आले. दिलेले टार्गेट पूर्ण न केल्यास त्याचा छळही केला जायचा. त्याच्यासोबत असे एकूण २० भारतीय होते. येथे त्‍याला तुझ्‍या घरच्‍यांना पैसे पाठवायला सांग म्‍हणून त्‍याला मारहाणही केली जायची.

Crypto Currency
Goa Fraud Case: त्याच जमिनीचा पुन्हा व्यवहार, म्हपाशातील एकाला 55 लाखांचा गंडा; मायलेकाविरोधात गुन्हा

दरम्यान, एक दिवस आशिष याने कुणाचा तरी मोबाईल मिळवून पत्नी पुनमशी व्हॉटसॲप कॉलद्वारे संवाद साधला व सर्व माहिती दिली. पुनम यांनी तत्काळ मायणा- कुडतरी पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद नोंदवली. मायणा कुडतरी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७०, ३७० (१ ), आणि ४२० व इमिग्रेशन कायदा, १९८३ च्या कलम १० नुसार गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली. याबाबत दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी परराष्ट्र खात्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने आशिष वाघच्या कॉल डिटेल्सवरुन कोव्हर्ट ऑपरेशन राबवून म्यानमारच्या सीमेनजीक असलेल्या ठिकाणाहून आशिषसह अन्य २० भारतीयांचीही सुटका केली. सुटकेनंतर सोमवारी त्‍यांना भारतात आणले.

समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीयांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची ऑफर देत थायलंड व लाओसमध्ये आमंत्रित केले जाते आणि तिथे त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जाते. त्यानंतर त्यांना बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार करून आणि ऑनलाइन वापरकर्त्यांना फसवण्याची ट्रेनिंग दिली जाते. त्यांना रोज नवनवीन टार्गेट्स दिले जातात आणि ते पूर्ण करू शकले नाहीत, तर त्यांना शिक्षा केली जाते.

थायलंडला त्‍याला घेऊन जाण्‍यास एक मुस्‍लीम व्‍यक्‍ती आली होती. त्‍याने त्‍याला म्यानमारमध्ये नेऊन सोडले. पुढे येथे कार्यरत असणाऱ्या मोठ्या संघटित टोळीच्या ताब्यात त्याला देण्यात आले. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला व त्यास फेक प्रोफाईल बनवून क्रिप्टो स्कॅममध्ये गुंतवण्यात आले. दिलेले टार्गेट पूर्ण न केल्यास त्याचा छळही केला जायचा. त्याच्यासोबत असे एकूण २० भारतीय होते. येथे त्‍याला तुझ्‍या घरच्‍यांना पैसे पाठवायला सांग म्‍हणून त्‍याला मारहाणही केली जायची.

Crypto Currency
Goa Fraud Case: बंगल्यासाठी जमीन देण्याचा वादा; मुंबईच्या अ‍ॅड फिल्म डिरेक्टरला गोव्यातील दाम्पत्याचा दीड कोटींचा चुना

दरम्यान, एक दिवस आशिष याने कुणाचा तरी मोबाईल मिळवून पत्नी पुनमशी व्हॉटसॲप कॉलद्वारे संवाद साधला व सर्व माहिती दिली. पुनम यांनी तत्काळ मायणा- कुडतरी पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद नोंदवली. मायणा कुडतरी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७०, ३७० (१ ), आणि ४२० व इमिग्रेशन कायदा, १९८३ च्या कलम १० नुसार गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली. याबाबत दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी परराष्ट्र खात्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने आशिष वाघच्या कॉल डिटेल्सवरुन कोव्हर्ट ऑपरेशन राबवून म्यानमारच्या सीमेनजीक असलेल्या ठिकाणाहून आशिषसह अन्य २० भारतीयांचीही सुटका केली. सुटकेनंतर सोमवारी त्‍यांना भारतात आणले.

समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीयांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची ऑफर देत थायलंड व लाओसमध्ये आमंत्रित केले जाते आणि तिथे त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जाते. त्यानंतर त्यांना बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार करून आणि ऑनलाइन वापरकर्त्यांना फसवण्याची ट्रेनिंग दिली जाते. त्यांना रोज नवनवीन टार्गेट्स दिले जातात आणि ते पूर्ण करू शकले नाहीत, तर त्यांना शिक्षा केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com