Goa Taxi: विमानतळावर स्वतंत्र काऊंटरबाबत जाब विचारण्यासाठी टॅक्सी चालकांची आमदार आर्लेकरांच्या घरासमोर गर्दी

मोपा विमानतळावर कामकाज बंद पाडण्याचा पेडणेतील टॅक्सीचालकांचा इशारा
Goa Taxi | Pernem | Mopa Airport
Goa Taxi | Pernem | Mopa Airport Dainik Gomantak

Goa Taxi: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी काऊंटवरचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पेडणे येथील स्थानिक टॅक्सी चालकांसाठी ब्ल्यू कॅब अंतर्गत नोंदणीचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तथापि, त्यावर टॅक्सीचालक समाधानी नाहीत. त्यांना विमानतळावर स्वतंत्र काऊंटर हवे आहे.

त्यामुळे संतप्त टॅक्सी चालकांनी बुधवारी सहायक वाहतूक संचालकांना निवेदन देत मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा दिला. दरम्यान, स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना स्वतंत्र टॅक्सी काऊंटरबाबत जाब विचारण्यासाठी या टॅक्सी चालकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली.

Goa Taxi | Pernem | Mopa Airport
Crime In Goa: 2022 वर्षात गोव्यात 'किती' गुन्हे दाखल झाले? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

दरम्यान, विमानतळ प्रशासनाशी झालेल्या बाचाबाचीनंतर सर्व स्थानिक टॅक्सीचालकांनी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांचे घर गाठले. त्यामुळे आमदार प्रवीण आर्लेकरा यांच्या घराबाहेर टॅक्सी चालकांची गर्दी झाली होती. हे सर्व टॅक्सी चालक विमानतळावरील स्वतंत्र काऊंटरबाबत जाब विचारण्यासाठी एकत्र आले.

Goa Taxi | Pernem | Mopa Airport
Baharain-Goa Flight: 'या' दिवशीपासून सुरू होणार बहारीन-दाबोळी विमानसेवा...

तत्पुर्वी टॅक्सी चालकांनी वाहतूक सहाय्यक संचालकांची भेट घेत, त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्यांचे गाऱ्हाणे मांडले. वारंवार निवेदने देऊनही टॅक्सी चालकांचे म्हणणे गांभीर्याने घेतले जात नसल्याची खंच टॅक्सी चालकांनी व्यक्त केली. टुरिस्ट कॅब, रेंट अ कार यांना कोण परवानगी देते, असा जाबही विचारण्यात आला.

यावेळी माहिती अधिकारांतर्गत एक अर्ज दाखल करण्यात आला असून त्याअंर्तगत त्यांनी दिलेला फॉर्म कायद्यानुसार आहे का, अशी माहिती विचारली आहे. ब्ल्यू कॅब काऊंटरबाबत काय पावले उचलली असेही टॅक्सीचालकांनी विचारले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com