Baharain-Goa Flight: 'या' दिवशीपासून सुरू होणार बहारीन-दाबोळी विमानसेवा...

गल्फ एअरची घोषणा; आठवड्यातून चार वेळा सेवा
Baharain-Goa Flight
Baharain-Goa FlightDainik Gomantak

Baharain-Goa Flight: उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यावर दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळाचे काय होणार हा प्रश्न गोव्यातील सर्वांनाच सतावत होता. तथापि, राज्य सरकारने वारंवार दाबोळी विमानतळ कार्यरत राहिल, असे स्पष्ट केले होते. त्याचीच प्रचिती एका नव्या माहितीमुळे येत आहे. या माहितीनुसार आता आखाती देशातून थेट गोव्यातील दाबोळीत विमानसेवा सुरू होणार आहे. गल्फ एअरने याबाबत घोषणा केली आहे.

Baharain-Goa Flight
Quepem Crime News : अंघोळ करताना युवतीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी केपेतील युवकाला अटक

आखाती देश असलेल्या बहारीन मधून गोव्यातील दाबोळीत थेट विमानसेवा सुरू होणार आहे. गल्फ एअर ही बहारीनची सरकारी मालकीची विमानसेवा कंपनी आहे. मार्च महिन्यापासून या सेवेला सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे, आठवड्यातील 4 दिवस ही सेवा असणार आहे. 27 मार्चपासून या विमानसेवेला सुरूवात होईल.

Baharain-Goa Flight
Fatorda: सराफ दुकानातून सोन्याचे 3.5 लाखाचे ब्रेसलेट चोरणाऱ्याला दाबोळी विमानतळावर अटक

या घोषणेमुळे दोन लाभ होणार आहेत. एकतर गोव्यातून थेट आखाती देशांमध्ये जाता येणे शक्य होणार आहे. तसेच दाबोळी विमानतळावर हे विमान उतरणार असल्याने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासह दाबोळी विमानतळही पूर्ण क्षमतेने पूर्ववत कार्यरत राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com