Crime In Goa: 2022 वर्षात गोव्यात 'किती' गुन्हे दाखल झाले? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

राज्यात वेर्णा येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळा आहे.
Crime In Goa
Crime In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात मागील वर्षी किती गुन्हे (Crimes In Goa) दाखल झाले याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी माहिती दिली. 2022 या वर्षात गोव्याच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये 489 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात दिली.

तसेच, राज्यात वेर्णा येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळा आहे. अशी माहिती सावंत यांनी दिली. प्रयोगशाळेबाबत भाजपचे आमदार कृष्णा दाजी साळकर (MLA Krishna Salkar) यांनी प्रश्न विचारला होता.

Crime In Goa
Sukanya Samriddhi Yojana: गोवेकर सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्या ; गोवा टपाल विभागाचे आवाहन

कोणत्या साली किती गुन्हे दाखल झाले.

सन 2021 मध्ये 413 गुन्हे, 2020 मध्ये 509 गुन्हे, 2019 मध्ये 470 आणि 2018 मध्ये 507 गुन्हे गोव्यात दाखल करण्यात आले.

कोणत्याही ठिकाणी गुन्हा घडला तर त्याठिकाणी जाण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात मोबाईल फॉरेन्सिक युनिट्ससह सुसज्ज करण्यात आली आहे. तसेच, संशयित नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) पदार्थांच्या तपासणीसाठी 03 रमन स्पेक्ट्रोमीटर खरेदी करण्यात आले आहेत. असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Crime In Goa
Parra Accident Case: पर्रा-साळगाव येथे दोन दुचाकींची भीषण टक्कर, थिवी येथील एकाचा मृत्यू

अमली पदार्थ चाचणी करण्यासाठी सरकारने ड्रग्ज डिटेक्शन किट (drugs detection kit) अपग्रेड केले असून सध्या यूएसमधील “सर्ची” ड्रग डिटेक्शन किट वापरले जात आहे.

"महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये लैंगिक अत्याचार पुरावा संकलन किट वापरली जाते. सायबर क्राईम पोलीस स्टेशन मोबाईल फॉरेन्सिक टूल, व्हिडिओ आणि पिक्चर फॉरेन्सिक एन्हांसमेंट टूल, इंटरनेट फॉरेन्सिक अॅनालिसिस सॉफ्टवेअर, डिस्क डुप्लिकेटर, विविध स्टोरेज सॉफ्टवेअर आयटम्सचे फॉरेन्सिक इमेजिंग आणि विश्लेषण टूल, मोबाइल फॉरेन्सिक अधिग्रहण आणि विश्लेषण साधन यासारख्या सॉफ्टवेअर अशा सुविधांनी सुसज्ज आहे." असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com