Goa Politics: काँग्रेस-‘आरजी’ नेत्यांची गुप्त बैठक? संभाव्य युतीवर चर्चा; गोव्याची अस्मिता अन् हितसंबंधांवर मंथन

Goa Congress RG Meeting: काँग्रेस पक्ष आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजी) यांच्या नेत्यांमध्ये शुक्रवारी सायंकाळी बैठक पार पडली.
Goa Congress RG Meeting
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य युतीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजी) यांच्या नेत्यांमध्ये शुक्रवारी सायंकाळी बैठक पार पडली.

विरोधी पक्षांची एकता बळकट करणे तसेच गोव्याची अस्मिता, हितसंबंध आणि भविष्य यांचे रक्षण करणे या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर व ‘आरजी’च्या युती समितीचे अध्यक्ष अमोल नावेलकर यांची भेट घेतली.

Goa Congress RG Meeting
Goa Politics: 'भाजपकडून योजनांचे गाजर'; काँग्रेसचा हल्लाबोल, 'नवे उद्योग आणण्यात सरकार अपयशी'

दरम्यान, या बैठकीपूर्वी शुक्रवारी सायंकाळी कॉंग्रेस भवनात गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राजकीय व्यवहार समितीची बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक आणि युतीबाबतचे मुद्दे चर्चेला आले.

पुढील काही दिवस चर्चेचेच!

गोव्यातील जनता विरोधी पक्षांच्या एकतेची मागणी करत असल्याचे या बैठकीत सदस्यांनी सांगितले. भाजपच्या विभाजनकारी आणि विनाशकारी कारभारामुळे गोव्यातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे ‘युती’ ही काळाची गरज आहे, असे मत पुढे आले. गोव्यातील जनतेचे व्यापक हित आणि त्यांच्या आकांक्षा यांना प्राधान्य देऊन, सहकार्याचे स्वरूप व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी पुढील काही दिवसांत चर्चा सुरू ठेवण्यावर दोन्ही पक्षांच्या युती समित्यांचे

Goa Congress RG Meeting
Amit Shah Goa Visit: अमित शहा दोन दिवस गोवा दौऱ्यावर; रविवारी भाजप भवनाचा लोकार्पण सोहळा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

RGP Congress Alliance Talks Goa:
Girish Chodankar Congress Alliance
Pramod Sawant BJP Meeting
Goa Congress RGP alliance
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com