Calangute Crime: किनारपट्टी तापली ! कळंगुटमध्ये राडा, परप्रांतियांची दादागिरी; विरोधकांनी सावंत सरकारला धरले धारेवर

Opposition Criticized Goa Government: विरोधकांकडून सरकारवर थेट शरसंधान साधणे सुरू झाले आहे. किनारी भागातील कायदा-सुव्यवस्था पूर्णत: बिघडल्‍याचा आरोप त्‍यांनी केला आहे.
Calangute Crime: किनारपट्टी तापली ! कळंगुटमध्ये राडा, परप्रांतियांची दादागिरी; विरोधकांनी सावंत सरकारला धरले धारेवर
Night ClubsDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute News: कळंगुटमध्‍ये क्‍लबच्‍या बाऊन्सर्सकडून स्थानिकांना झालेली मारहाण, पर्यटकांनी काढलेली युवतीची छेड, बंदी असूनही रात्री १० नंतर किनाऱ्यांवर सुरू असलेल्‍या संगीत पार्ट्या यामुळे विरोधकांकडून सरकारवर थेट शरसंधान साधणे सुरू झाले आहे. किनारी भागातील कायदा-सुव्यवस्था पूर्णत: बिघडल्‍याचा आरोप त्‍यांनी केला आहे.

काही बेकायदा गोष्‍टी किनारी भागात घडतात असे सरकारनेही अप्रत्यक्षपणे मान्य करत तेथील पोलिस गस्तीत दुपटीने वाढ करण्‍याची घोषणा केली आहे. उपलब्ध पोलिसांपैकी ४० टक्के पोलिस गस्त घालतील, असेही जाहीर केले आहे. रात्री दहाच्या ठोक्याला संगीत बंद केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना द्यावी लागली आहे.

Calangute Crime: किनारपट्टी तापली ! कळंगुटमध्ये राडा, परप्रांतियांची दादागिरी; विरोधकांनी सावंत सरकारला धरले धारेवर
Calangute Crime: 'कळंगुट'चे वातावरण का झाले आहे गढूळ? गैरप्रकार, पर्यटक-स्थानिक संघर्षाला निर्बंध घालण्याचे आव्हान

किनारी भागातील या परिस्थितीला आपले स्‍वत:चे व्यवसाय भाडेपट्टीवर दिलेले गोमंतकीय जबाबदार आहेत, असा आरोप कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी यापूर्वीच केला आहे. मात्र तो त्यांच्या अंगलट आला आहे. मंत्री, आमदारांनी आपले व्यवसाय भाडेपट्टीवर द्यावेत आणि सर्वसामान्य गोमंतकीयांनी ते भाडेपट्टीवर देऊन पैसे कमवू नयेत काय, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. तर, कोणी कोणते डेक भाड्याने दिले आहेत हे जाहीरपणे सांगू काय, अशी विचारणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

आसगाव येथील ध्वनिप्रदूषणाच्या मुद्यावरून या विषयाला वाचा फुटली आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदीचे आदेश दिलेले क्लब तेथे कार्यरत असल्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या पाहणीत उघड झाले होते. स्थानिकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेही काढले होते. आसगाव येथेच आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर बाऊन्सर्सच्या मदतीने मोडण्‍याचे प्रकरणही बरेच गाजले होते.

Calangute Crime: किनारपट्टी तापली ! कळंगुटमध्ये राडा, परप्रांतियांची दादागिरी; विरोधकांनी सावंत सरकारला धरले धारेवर
Calangute Crime News: कळंगुटमध्ये 'एवढ्या' लाखांचा गांजा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई; पुढील तपास सुरु

व्‍हेंझी व्‍हिएगस, आम आदमी पक्षाचे आमदार

सध्‍याच्‍या घडीला पोलिसांचे कुणालाच भय राहिलेले नाही. गोमंतकीय जनतेचा पोलिसांवरील विश्‍‍वासही उडालेला आहे आणि त्यातूनच असे गुंडगिरीचे प्रकार किनारपट्टी भागात वारंवार होऊ लागले आहेत. गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः रसातळाला गेली आहे. पोलिस लोकांना संरक्षण देण्याऐवजी स्वतःची तुंबडी कशी भरेल यावरच जास्त भर देत आहेत. गोव्‍यासाठी ही चिंताजनक बाब आहे.

गुन्हा घडण्यापासून रोखणे आणि गुन्‍ह्यांची उकल करणे या दोन टप्प्यांवर काम केले जाते. गुन्हे उकल करण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. गुन्हे घडू नयेत यासाठी उपलब्ध पोलिसांपैकी ४० टक्के पोलिस रात्रीची गस्त घालतील. शिवाय किनारी भागातील संगीत रात्री दहाच्या ठोक्याला बंद केले जाईल. इमारतीत सुरू असलेले संगीत मर्यादेतच वाजवले जाते की नाही, यावरही सरकारी यंत्रणेची नजर असेल. किनारी भागातील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली नाही. एक-दोन अप्रिय घटना जरूर घडल्या आहेत. त्या प्रकरणी पोलिसांवरही कारवाई झाली आहे. किनारी भागात शांतता प्रस्थापित करण्यावर सरकारचा भर आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

पर्यटनस्‍थळ हे शांततामय असले पाहिजे. हिंसाचारामुळे पर्यटक गोव्यात येण्यापासून परावृत्त होऊ शकतात. किनारी भागात महिला सुरक्षितपणे फिरू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. स्थानिकांवर हात उचलण्यापर्यंत बाऊन्सर्सची मजल गेली आहे. बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जोरावर परप्रांतीय व्यावसायिक दादागिरी करत आहेत आणि सरकार हतबलपणे हे सर्व उघड्या डोळ्‍यांनी पाहत आहे.

Calangute Crime: किनारपट्टी तापली ! कळंगुटमध्ये राडा, परप्रांतियांची दादागिरी; विरोधकांनी सावंत सरकारला धरले धारेवर
Calangute Crime: पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोधले 51 मोबाईल फोन; कळंगुट PI नी केलंय 'हे' आवाहन

विजय सरदेसाई, विरोधी आमदार

पोलिस क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे अशा घटना घडत आहेत. गोव्यात येणाऱ्या काही पर्यटकांना दिल्लीतील राजकारण्यांचा वरदहस्त लाभला असल्याने ते स्थानिकांशी दादागिरी करतात तर काही स्थानिक गुंड आमदार, मंत्र्याचे नाव सांगून पर्यटकांना मारहाण करतात. दुसरीकडे पोलिस आपले पोस्टिंग आहे तेथेच रहावे यासाठी या राजकारण्यांच्या कलाने घेतात. यामुळे कायदा सुव्यवस्था ढासळतेय.

Calangute Crime: किनारपट्टी तापली ! कळंगुटमध्ये राडा, परप्रांतियांची दादागिरी; विरोधकांनी सावंत सरकारला धरले धारेवर
Calangute Crime: सिकेरीतील छाप्यात 8 लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त; ओडिशाच्या युवकाला अटक

भाडेपट्टीवर देऊन पैसे कमवू नयेत काय, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. तर, कोणी कोणते डेक भाड्याने दिले आहेत हे जाहीरपणे सांगू काय, अशी विचारणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. आसगाव येथील ध्वनिप्रदूषणाच्या मुद्यावरून या विषयाला वाचा फुटली आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदीचे आदेश दिलेले क्लब तेथे कार्यरत असल्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या पाहणीत उघड झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com