Calangute Crime: 'कळंगुट'चे वातावरण का झाले आहे गढूळ? गैरप्रकार, पर्यटक-स्थानिक संघर्षाला निर्बंध घालण्याचे आव्हान

Calangute Crime News: नवीन पर्यटन हंगाम सुरू होण्यास अजूनही पंधरवडा बाकी असला तरी पर्यटकांची पावले गोव्याकडे वळू लागली आहेत. अशातच, मागील तीन-चार दिवसांतील तणावपूर्वक घटनांमुळे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कळंगुटचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
Calangute Crime News: नवीन पर्यटन हंगाम सुरू होण्यास अजूनही पंधरवडा बाकी असला तरी पर्यटकांची पावले गोव्याकडे वळू लागली आहेत. अशातच, मागील तीन-चार दिवसांतील तणावपूर्वक घटनांमुळे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कळंगुटचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
Calnagute Beach Dainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Beach Increased Crime Incidents

नवीन पर्यटन हंगाम सुरू होण्यास अजूनही पंधरवडा बाकी असला तरी पर्यटकांची पावले गोव्याकडे वळू लागली आहेत. अशातच, मागील तीन-चार दिवसांतील तणावपूर्वक घटनांमुळे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कळंगुटचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. पहिल्या प्रकरणात, तीन पशुवैद्यकीय डॉक्टरांवर हल्ला होण्याची घटना उघडकीस आली.

तसेच दांडिया नृत्य संपवून घरी परतणाऱ्या तिघा युवतींची छेड काढणाऱ्या पर्यटकांसह दलालाला चोप दिल्याची घटना पोरबावाडा-कळंगुट येथे घडली. त्यातच, रविवारी मध्यरात्री बागा येथे एका क्लबबाहेर दोघा स्थानिकांना क्लबच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या संपूर्ण प्रकरामुळे कळंगुटमधील पर्यटन वातावरण हंगामापूर्वीच गढूळ झाले आहे. अशावेळी पर्यटक व स्थानिक यांच्यामधील वाढता संघर्ष अन् खटके यामुळे पर्यटन सौहार्द टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

डॉक्टरांना मारहाण; दोघांना पोलिस कोठडी

शनिवारी मध्यरात्री १२.३० वा.च्या सुमारास कांदोळी किनारी तिघा पशुवैद्यकीय डॉक्टरांना मारहाण होण्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोघांना अटक केली. तेथील शॅकच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. याप्रकरणी दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या पर्यटकांनी दारूची मागणी केली असता, शॅकवरील कर्मचाऱ्यांनी येथे दारू नाही, असे सांगितल्यानंतर हा वाद उफाळला. नंतर प्रकरण हातघाईवर गेले. कालांतराने, कळंगुट पोलिसांनी पर्यटकांच्या तक्रारीच्या आधारे पर्यटक महिलेची छेड तसेच इतर पर्यटकांस मारहाण केली म्हणून दोघांना अटक केली. याप्रकरणात दोन्ही संशयित जितेंद्र सिंग (२४, उत्तराखंड) व अरुण कुमार विश्‍वकर्मा (२५, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली.

शॅक मालकीण म्‍हणते...

यासंदर्भात ज्या शॅकमध्ये ही घटना घडली, तेथील शॅकमालकिणीने माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, शॅकचे काम सुरू असताना, शनिवारी रात्री ११च्या सुमारास दोघे पर्यटक तिथे आले. ते जोडपे होते. यावेळी महिला पर्यटकाने दारूची तसेच सिगारेटची मागणी केली. मुळात आमच्या शॅकचे काम सुरू होते. तसेच या दोघाही पर्यटकांत आपापसांत वाद सुरू होते. हे पर्यटक घटनास्थळी विचित्र वागू लागले व शिविगाळ करू लागले. जरी आमच्या शॅकवरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली असे बोलले जात असले तरी, किनाऱ्यावर खूप लोक असतात. त्यामुळे त्यांना कुणी मारहाण केली, हे माहिती नाही.

ड्रग्‍स सेवनाचा आरोप

यावेळी संबंधितांना आम्ही इस्पितळात जाऊया, असे सांगितलेदेखील; मात्र ते जाण्यास तयार नव्हते. कदाचित त्यांनी ड्रग्सचे सेवन केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच ४८ तासांनंतर पर्यटकांनी याप्रकरणी तक्रार दिली. जर खरेच काही घडले असते, तर त्याच रात्री संबंधितांनी का तक्रार दिली नाही? असा सवाल उपस्थित होतो.

परंतु खासगी इस्पितळात उपचार करून घेतल्यानंतर, ते येऊन आमच्या विरोधात तक्रार करतात, याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरते? पर्यटकांच्या दाव्यानुसार, त्यांच्यावर पंधराजणांच्या जमावाने हल्ला चढविला.

मग घटनेदिवशी त्यांनी सरकारी इस्पितळात स्वतःची वैद्यकीय चाचणी का केली नाही व तेव्हाच पोलिसांत तक्रार का नाही दिली? असा सवाल शॅकमालकिणीने उपस्थित केला.

रस्त्यावरून चालणाऱ्या युवतींची काढली छेड

त्याचप्रमाणे, कळंगुट येथे शनिवारी मध्यरात्री रस्त्यावरून चालत जाणाऱ्या युवतींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. संशयित प्रेम कुमार पांडे (३०, जयपूर) व कृष्णा सिंग (२४, बिहार) तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. रविवारी उत्तररात्री दांडिया नृत्य संपवून घरी जाणाऱ्या तिघा युवतींची छेड काढणाऱ्या पर्यटकाला तसेच त्याच्यासोबत असलेल्या दलालाला स्थानिकांकडून चोप देण्यात आला. ही घटना पोरबावाडा येथे घडली होती. एका क्लबच्या बाहेर पीडित युवतींवर ही टिप्पणी करण्यात आली होती.

या प्रकारानंतर सोमवारी स्थानिकांनी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांची भेट घेऊन याविषयावर पंचायत कार्यालयात चर्चा केली. कळंगुट परिसरात डान्स बार तथा मसाज पार्लरला परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

कारवाई अटळ

उत्तर गोव्याचे अधीक्षक अक्षत कौशल यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अशाप्रकारचे गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत. संबंधितांवर कारवाई होणारच आहे.

टाऊट्स, पर्यटक, बाऊन्‍सर्समध्‍ये वाद; दोघांना मारहाण

रविवारी उत्तररात्री बागा येथे एका क्लबच्या बाहेर टाऊट्स, पर्यटक व बाऊन्सर्समध्ये झालेल्या वादात, काहींनी संशयावरून अकारण दोघा स्थानिकांना मारहाण करण्याची घटना घडली. यात आकाश व अमन नामक दोघा बंधूंच्या डोक्यावर दंडुक्यांनी वार करण्यात आले. यातील एकाला १२ तर दुसऱ्याला आठ टाके पडले.

याप्रकरणी स्थानिकांनी सोमवारी सायंकाळी कळंगुट पोलिस स्थानकावर धडक देत पोलिसांना जाब विचारला. स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असे म्हणत, जमावाने पोलिस स्थानकात ठिय्या मांडला. या प्रकरणात गुंतलेल्यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी याप्रकरणी पाचजणांना अटक झाली होती. मात्र, मारहाण करणारे पंधरा ते वीसजण होते. त्यामुळे सर्वांना अटक करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी लावून धरली.

या मारहाण प्रकरणात पोलिसांनी मोहन सिंग (२८, राजस्थान), लबाजित बसुमाता (३४, पश्चिम बंगाल), रवींद्र सिंग (४२, उत्तराखंड) या तिघा क्लबच्या कर्मचाऱ्यांना अटक केली. बागा येथे ज्या क्लबबाहेर दोघा स्थानिकांना मारहाण झाली होती, तो ‘डाउनटाऊन’ क्लब सोमवारी रात्री उशिरा पोलिसांच्या उपस्थित सील करण्यात आला. परिणामी, युवकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. घटना घडली तेव्हा, क्लबच्या मालकाने बंदुकीचा धाकदेखील दाखवल्याचा दावा पीडितांनी केला आहे.

Calangute Crime News: नवीन पर्यटन हंगाम सुरू होण्यास अजूनही पंधरवडा बाकी असला तरी पर्यटकांची पावले गोव्याकडे वळू लागली आहेत. अशातच, मागील तीन-चार दिवसांतील तणावपूर्वक घटनांमुळे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कळंगुटचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
Siolim Crime: मद्यधुंद सरकारी कर्मचाऱ्याला लोकांकडून चोप! युवतीचा विनयभंग, घरच्यांना मारहाण

रात्रीच्या वेळी आयआरबी पोलिस तैनात करा...

गोव्यातून जाताना पर्यटक हे चांगल्या आठवणीने जाणे गरजेचे आहे; कारण वाईट स्मृतीने माघारी फिरल्यास याचा विपरित परिणाम गोवा तसेच पर्यटनावर होईल. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त कडक हवी. विशेषतः टिटोज लेन व इतर महत्त्वाच्या स्थळी बंदूकधारी पोलिसांची रात्रीच्या वेळी उपस्थिती दिसलीच पाहिजे. तसेच टाऊट्स व बाऊन्सर नसावेत. केवळ एक-दोन सुरक्षा रक्षक असावेत.

क्लबबाहेर बाऊन्सरची गर्दी नसावी. बागा व कांदोळी भागातील घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून रात्रीच्या वेळी अतिरिक्त पोलिस गस्त ठेवावी. त्यामुळे आयआरबी पलटण वीकेंडला किनारी भागात तैनात करावेच. यासंदर्भात मी वरिष्ठ पोलिसांशी बोललो आहे. तसेच गोव्यातील स्थानिकांसह पर्यटकांचे संरक्षण करणे हे मुख्यमंत्र्यांचेही कर्तव्य आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com