Goa: 'वीज मंत्र्यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे'! मीटरच्या नोटिशीवरुन काँग्रेस आक्रमक; अभियंत्यास घेराव घालून विचारला जाब

Amit Palekar Congress protest: काँग्रेसने विद्युत भवनातील वीज खात्याच्या अभियंत्यास घेराव घालून जाब विचारला. वीज मंत्र्यांनी या नोटिशीविषयी जनतेला स्पष्टीकरण द्यावे,अशी मागणी त्यांनी केली.
Amit Patkar
Amit Patkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वीज खात्याने काढलेल्या नोटिशीनुसार वीज मीटर घराबाहेर स्थलांतरित करण्याची मुदत २८ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यानंतर कोणी मीटर त्यापद्धतीने बसविले नाही, तर वीजजोडणी खंडित केला जाईल, आणि नव्याने मीटर जोडणी घ्यावी लागेल, असा नियम काढला आहे, त्याविरोधात काँग्रेसने विद्युत भवनातील वीज खात्याच्या अभियंत्यास घेराव घालून जाब विचारला. वीज मंत्र्यांनी या नोटिशीविषयी जनतेला स्पष्टीकरण द्यावे,अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने विद्युत भवनात अभियंत्यांना घेराव घातला आणि काढलेल्या नोटिशीविषयी विचारणा केली. या घेराव आंदोलनाविषयी पाटकर म्हणाले, वीज खात्याने नुकतीच एक नोटीस जारी केली आहे. त्याचा ३० हजार मीटरधारकांना फटका बसणार आहे. घराबाहेर मीटर बसविणे धोक्याचे आहे.

Amit Patkar
Smart Electricity Meter: 3 वर्षांत प्रत्‍येक घराला 'स्मार्ट वीज मीटर' बसणार! वीज खात्याची तयारी; अचूक बिल, चोरी रोखण्यास मदत

सध्याचे मीटर सील असताना त्यांचा गैरवापर कसा होतो, असाही सवाल त्यांनी केला. जर गोव्यातील नागरिकांनी एका महिन्याचे वीज बिल भरले नाही, तर विभाग तात्काळ त्यांचा वीजपुरवठा खंडित करतो. सरकारी खात्याचीच थकित बिलाची रक्कम सुमारे ३०० कोटींची आहे ते बिल वसूल झाले नसल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

Amit Patkar
Water Flow Meter: 'मतांसाठी मोफत पाणी देणार नाही'! गोव्यात वॉटर फ्लो मीटर’चा होणार वापर; पाणी चोरी, गळतीवर येणार नियंत्रण

जेईआरसीची जुनीच सूचना ः ढवळीकर

संयुक्त वीज नियामक आयोगाची (जेईआरसी) जुनी सूचना आहे, त्या सूचनेची आम्ही अमलबजावणी करीत आहोत. जुने मीटर अगोदरच हलविण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या वीज खात्याचा हा नियम किंवा सूचना नाही. नियम व अटीनुसार आपण काम करीत आहोत, या सूचनेवर काही पर्याय काढता येईल काय हे पाहिले जाईल. त्याविषयी आपण मुख्यमंत्र्यांकडेही जाऊ. लोकांना त्रास देण्याचा आमचा मानस नाही, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com