Margao Muncipality : मडगाव नगराध्‍यक्षांची एकाधिकारशाही : नगरसेवक आमोणकर

आमदाराला अंधारात ठेवून शिगमोत्सव; भाजपमध्‍ये फूट!
Margao Municipal Council
Margao Municipal Council Dainik Gomantak

मडगावातील शिगमोत्सव यशस्वीपणे साजरा करण्यात आला खरा, पण लगेच नगरसेवक महेश आमोणकर यांनी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्‍याविरोधात तोफ डागली व नगरपालिकेत भाजप नगरसेवकांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दाखवून दिले.

शिरोडकर यांनी नगरसेवकांना सोडाच, मडगाव शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष व आमदार दिगंबर कामत यांनाही विश्‍‍वासात घेतले नसल्याचे त्‍यांनी पत्रकारांना सांगितले.

Margao Municipal Council
Save Mhadei Save Goa : कर्नाटकच्या हितासाठी म्हादईचा बळी : विरियेतो फर्नांडिस

नगराध्यक्ष शिरोडकर हे डबल गेम खेळत आहेत. त्‍याबाबत मी कालच आमदार कामत यांच्‍याशी बोललो असून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. समितीचे सचिव दामू नाईक यांनाही अंधारात ठेवण्‍यात आले.

नगरसेवकांच्या कुटुंबीयांना मुख्य रंगमंचावर बसण्यास दिले नाही. असे असताना नगराध्यक्ष शिरोडकर यांचे कुटुंब मुख्य रंगमंचावर कसे? असा सवाल आमोणकर यांनी उपस्‍थित केला.

काही माजी नगरसेवक मुख्य रंगामंचावर बसलेले असताना शिरोडकर यांनी माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर यांना तिथे बसता येणार नाही असे सांगून त्यांचा अपमान केला, असेही आमोणकर म्‍हणाले.

Margao Municipal Council
खंडणी विषय बंद करणाऱ्यांना काहीतरी लपवायचे आहे : फेरेरा

अन्‍यथा वेगळा विचार करावा लागेल

सर्व नगरसेवकांना विश्र्वासात घेऊन व त्यांच्याशी मिळून मिसळून काम करावे ही अट घालूनच दामोदर शिरोडकर यांना नगराध्यक्षपदी निवडले होते. मात्र आता ते नगरसेवकांना जुमानत नाहीत. आमदार व पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज देणे गरजेचे आहे. जर असेच पुढे चालू राहिले तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.

- महेश आमोणकर, नगरसेवक

मी कधीही नगरसेवकांमध्ये भेदभाव केलेला नाही. जे काही निर्णय घेतले आहेत, ते सर्वांना विश्र्वासात घेऊनच घेतले. शिगमोत्सवाच्या रात्री मी स्वत: नगरपालिका चौकात उपस्थित राहून सकाळपर्यंत परिसर स्वच्छ केला. आमोणकर यांच्‍याबद्दल आपल्या मनात कोणतीही कटू भावना नाही. जर त्यांना काही अपेक्षित असेल तर ते त्यांनी सांगावे.

- दामोदर शिरोडकर, नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com