Grade Tampering Allegations: लेखी मुलाखतीच्या गुणपत्रिकेत फेरफार? दक्षिणेतील उमेदवारांचा दावा; मये तंत्रनिकेतन वादाच्या भोवऱ्यात

Exam Manipulation Accusations in Goa: गुणपत्रिकेची वैयक्तिक पडताळणी करण्यासाठी आलेल्या दोन युवतींचे पडताळणी केल्यानंतरही समाधान झाले नाही.
Grade Tampering Allegations: लेखी मुलाखतीच्या गुणपत्रिकेत फेरफार? दक्षिणेतील उमेदवारांचा दावा; मये तंत्रनिकेतन वादाच्या भोवऱ्यात
Grade Tampering AllegationsDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: राज्यात ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा गाजत असतानाच आता सरकारी नोकरीसाठी घेतलेल्या लेखी मुलाखतीत घोळ झाल्याचा संशय आहे. कारकून पदासाठी घेतलेल्या ‘कौशल्य’ परीक्षेच्या गुणपत्रिकेत फेरफार झाला आहे, अशी दक्षिण गोव्यातील काही उमेदवारांची तक्रार आहे. या प्रकारामुळे ''कौशल्य'' विषयाची परीक्षा घेण्यात आलेले मये येथील सरकारी तंत्रनिकेतन वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

गुणपत्रिकेची वैयक्तिक पडताळणी करण्यासाठी आलेल्या दोन युवतींचे पडताळणी केल्यानंतरही समाधान झाले नाही. गुणपत्रिकेत फेरफार झाल्याचा ठाम दावा, या युवतींसह त्यांच्यासमवेत आलेल्या गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी केला आहे. न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण उच्च पातळीवर नेण्यात येईल. असेही या युवतींसह गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले आहे. गुणपत्रिकेत फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करणाऱ्या दोन युवतींना गुणपत्रिकेच्या वैयक्तिक पडताळणीसाठी आज (बुधवारी) मये येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी भाष्य करण्याचे मात्र तंत्रनिकेतनच्या अधिकाऱ्यांनी टाळले.

उपजिल्हाधिकारी कार्यालयात भरावयाच्या कारकून पदासाठी अलीकडेच घेण्यात आलेल्या मुलाखतीवेळी कौशल्य विषयाची लेखी परीक्षा घेण्यात आली आहेत. जवळपास ३ हजार उमेदवारांनी मुलाखत दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

Grade Tampering Allegations: लेखी मुलाखतीच्या गुणपत्रिकेत फेरफार? दक्षिणेतील उमेदवारांचा दावा; मये तंत्रनिकेतन वादाच्या भोवऱ्यात
Cash For Job Scam: ''गोवा आता घोटाळ्याची भूमी म्हणून देशभर नावारुपास आलाय'', कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन पालेकर बरसले

''कौशल्य'' विषयाची परीक्षा मये येथील सरकारी तंत्रनिकेतन मधून घेण्यात आली होती. माहिती हक्क कायद्याअंतर्गत गुणपत्रिका मिळवली असता, कौशल्य परीक्षा दिलेल्या काही उमेदवारांना गुणपत्रिकेत घोळ झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर सासष्टी तालुक्यातील रतिका शिरोडकर आणि नविता नाईक या दोन युवतींनी तंत्रनिकेतनच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुणपत्रिकेची तपासणी केली.

Grade Tampering Allegations: लेखी मुलाखतीच्या गुणपत्रिकेत फेरफार? दक्षिणेतील उमेदवारांचा दावा; मये तंत्रनिकेतन वादाच्या भोवऱ्यात
Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

हा मोठा घोटाळा

राज्यात सध्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. गुणपत्रिकेतील फेरफार हा या घोटाळ्याचाच भाग आहे, असे गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) प्रशांत नाईक यांनी स्पष्ट करून या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. अन्याय झालेल्या उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत गप्प राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर, विकास भगत, संतोषकुमार सावंत आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com