Valpoi News : वाळपईत मॉन्सूनपूर्व कामांचे तीनतेरा, अर्ध्याहून अधिक कामे अपूर्ण

प्रभाग 9 मधील नाला प्रदूषित : अर्ध्याहून अधिक कामे अपूर्ण; नागरिकांमध्ये चिंता वाढली
Valpoi : Open drains in places.
Valpoi : Open drains in places. Gomantak Digital Team
Published on
Updated on

वाळपई : वाळपई नगरपालिका क्षेत्रात मॉन्सूनपूर्व कामे अजूनपर्यंत पूर्णत्वास आलेली नाहीत. अर्ध्याहून अधिक कामे पूर्ण होणे बाकी आहे. त्यात वाळपई मुख्य बाजार परिसरात गटार उसपणे, लादी बसवणे, त्याचबरोबर प्रभाग 3, 8, 9 मध्ये नाल्यांची साफसफाई अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी पाणी तुंबून राहण्याची भीती व्यक्त केली आहे.

वाळपई मुख्य बाजारात असलेल्या गटारातील सांडपाणी उपसण्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यात गटारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या साचलेल्या अवस्थेत आहेत. तसेच काही गटारावरील लाद्या मोडलेल्या अवस्थेत तर काही ठिकाणी लाद्याच गायब आहेत. त्याठिकाणी व्यवस्थित लाद्या बसविण्याची गरज आहे.

Valpoi : Open drains in places.
Valpoi News : चरावणेचा युवक शेतीतून ‘स्वयंपूर्ण’ते कडे; भाजीपाला पिकवण्यावर भर

प्रभाग 9 मध्ये असलेला नाला दूषित झाला आहे. गेल्या वर्षी या भागात डेंग्यूचे प्रमाण वाढले होते. तसेच पावसाळ्यात या ठिकाणी अनेक वेळा पूर येऊन शेजारी असलेल्या घरामध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले आहेत. वाळपई नगरपालिकेचे मुख्याधिकारी दशरथ गावस यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की मॉन्सूनपूर्व कामे 30 मेपर्यंत पूर्ण करण्यात येतील. मात्र, अजूनपर्यंत ही कामे पूर्ण झालेली नाहीत.

Valpoi : Open drains in places.
Valpoi News : ‘वाळपई नवोदय’ला मिळणार विज्ञान वर्ग

पूर येण्याची भीती!

वाळपईतील नदी व नाल्यांची साफसफाई जेसीबीच्या साहाय्याने करणे गरजेचे आहे. कारण जर वेळीच नाल्याची साफसफाई केली नाही तर पूर येण्याची भीती असते. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात वाळपई हनुमान मंदिराकडे पूर आला होता व काही दुकानांत पाणी शिरले होते. त्यामुळे यंदा पुन्हा ही स्थिती निर्माण होऊ नये म्हणून लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी वाळपई भागातील नागरिक करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com