कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथे बोगद्यात चिखलमिश्रित पाणी रूळावर आल्यामुळे मंगळवारी दुपारी वाहतूक कोलमडली होती. रात्री ८ वाजता पूर्ववत झालेली सेवा मध्यरात्री ३ वाजता पुन्हा पाणी वाढल्याने बंद पडली. त्यानंतर तब्बल १७ तासांनंतर, बुधवारी रात्री ८.३५ वाजता या मार्गावरील मलबा काढून रेल्वे मार्ग खुला करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.
मात्र, प्रत्यक्ष रेल्वे वाहतूक सकाळी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे १३ गाड्या रद्द केल्या, तर १७ गाड्या अन्य मार्गाने वळविल्या. कालपासून येथे १०० हून अधिक कामगार आणि २५ सुपरवायझर चिखलमय पाणी हटविण्याच्या कामात गुंतले होते.
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे येथील बोगद्यात चिखल जमा झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोलमडली. रेल्वे सेवा पूर्वपदावर आली होती; पण आज पहाटे परत एकदा बोगद्यात चिखलमय परिस्थिती उद्भवल्याने रेल्वे सेवा पुन्हा कोलमडली. वंदे भारत, जनशताब्दी, मांडवी, सावंतवाडी-दिवा, मुंबई- मंगळुरूसह १३ गाड्या रद्द करण्यात आल्या, तर मंगला एक्स्प्रेससह १७ गाड्या पनवेल, लोणावळा, पुणे, मिरज, बेळगाव -मडगाव यामार्गे वळविण्यात आल्या आहेत.
१. क्र. २२२२९ : मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस
२. क्र. १२०५१ : मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्स्प्रेस
३. क्र. १०१०३ मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन मांडवी एक्सप्रेस
४. क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी - मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस
५. क्र. १०१०४ मडगाव जंक्शन- मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस
६. क्र. ५०१०८ मडगाव जंक्शन - सावंतवाडी रोड प्रवासी गाडी
७. क्र. २२१२० मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस
८. क्र. १२०५२ मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी - जनशताब्दी एक्स्प्रेस
९. क्र. १०१०६ सावंतवाडी रोड - दिवा एक्सप्रेस.
१०. क्र. १२४४९ मडगाव जंक्शन - चंदीगड एक्स्प्रेस
११. क्र. १२६२० मंगळुरू सेंट्रल - लोकमान्य टिळक एक्स्प्रेस.
१२. क्र. १२१३४ मंगळुरू जंक्शन - मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस
१३. क्र. ५०१०७ सावंतवाडी रोड - मडगाव जंक्शन प्रवासी गाडी.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग मान्सून कालावधीसाठी कमी करण्यात आला आहे. शिवाय मध्य रेल्वे विभागात पाणी आल्याने गाड्यांना उशीर होत होता. आता पेडणेतील रुळावरील पाण्यामुळे या मार्गावरील सेवाच कोलमडली आहे. याचा त्रास प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झाला. गाड्यांची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या पर्यायाचा शोध घ्यावा लागत आहे. काल साडेपाच तासांच्या प्रतीक्षेनंतर आता पुन्हा अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
गाडी क्र. २०१११ मुंबई सीएसएमटी - मडगाव जं. कोकणकन्या एक्स्प्रेसचा ९ रोजी सुरु झालेला प्रवास सावंतवाडी रोड येथे संपेल व सावंतवाडी रोड - मडगाव जंक्शन दरम्यान अंशतः रद्द केला जाईल. गाडी क्र. १२६१९ लोकमान्य टिळक (टी) - मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास सावंतवाडी रोडपर्यंत असेल. सावंतवाडी रोड - मंगळुरू सेंट्रलदरम्यान अंशतः रद्द केला जाईल.
कोकण रेल्वेने मडगाव स्टेशनवर मदत कक्ष सुरु केला असून मदतीसाठी प्रवाशांनी ०८३२-२७०६४८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविले आहे.
गाडी क्र. १२६१८ एच. निजामुद्दिन - एर्नाकुलम जं. मंगला एक्सप्रेसचा ९ रोजीचा प्रवास पनवेल - लोणावळा - पुणे - मिरज - लोंढा - मडगाव मार्गे वळवला आहे.
गाडी क्र. १९५७७ तिरुनेलवेली - जामनगर एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास आता कुमठा येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळविला आहे.
गाडी क्र. १६३३६ नागरकोइल - गांधीधाम एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास आता उडुपी येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. गाडी क्र. १२२८३ एर्नाकुलम - एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास जोकट्टे येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल.
गाडी क्र. २२६५५ एर्नाकुलम - एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा १० रोजीचा प्रवास थलास्सेरी येथून शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल.
गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा १० रोजीचा प्रवास तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून १६.५५ वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आला व शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात आला.
गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) - तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेसचा ९ रोजी सुरू झालेला प्रवास आता सावंतवाडी रोडला पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे पाठीमागे वळवण्यात येईल.
गाडी क्र. २२११३ लोकमान्य टिळक (टी) - कोचुवेली एक्स्प्रेसचा ९ रोजी सुरु झालेला प्रवास सिंधुदुर्ग येथून पनवेल - पुणे जंक्शन - सोलापूर जंक्शन मार्गे पाठीमागे वळवला जाईल.
गाडी क्र. १२४३२ ह. निजामुद्दीन - तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास राजापूर रोड येथून पनवेल - पुणे जंक्शन - सोलापूर जंक्शनमार्गे मागे वळवली जाईल.
गाडी क्र. १९२६० भावनगर - कोचुवेली एक्स्प्रेसचा ९ रोजी सुरू झालेला प्रवास रत्नागिरी येथून पनवेल - पुणे जंक्शन - सोलापूर जंक्शन मार्गे वळवला जाईल.
गाडी क्र. १२२२३ लोकमान्य टिळक (टी) - एर्नाकुलम एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास चिपळूण येथून पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे वळवला जाईल.
गाडी क्र. २०९३२ इंदूर जं. - कोचुवेली एक्स्प्रेसचा ९ रोजीचा प्रवास ०९/०७/२०२४ रोजी सुरत - जळगाव मार्गे वळवला.
गाडी क्र. २२१४९ एर्नाकुलम जं. - पुणे जं. एक्स्प्रेसचा प्रवास पेडणे येथून लोंढा मिरज मार्गे वळवला जाईल.
गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. - मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास मडगाव लोंढा - मिरज - पुणे - पनवेल मार्गे वळवण्यात येईल.
गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम जं. ह. निजामुद्दिन प्रवास मडगाव - लोंढा - मिरज - पुणे -
पनवेल मार्गे आणि पुढील योग्य मार्गाने वळवण्यात येईल.
गाडी क्र. १२४३१ तिरुअनंतपुरम सेंट्रल - एच. निजामुद्दिन राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास आता मडगाव - लोंढा - मिरज - पुणे - पनवेल मार्गे आणि पुढील योग्य मार्गाने वळवण्यात येईल.
गाडी क्र. १२४८३ कोचुवेली - अमृतसर जं. एक्सप्रेस प्रवास पलक्कड जंक्शन मार्गे इरोड जं. - जोलारपेट्टई - रेनिगुंटा - वाडी - सोलापूर जं. - पुणे जं. - लोणावळा - पनवेल आणि पुढील योग्य मार्गाने वळविला जाणार आहे.
गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम - एच. निजामुद्दिन एक्स्प्रेसचा प्रवास पलक्कड जंक्शन मार्गे इरोड जं. - जोलारपेट्टई - रेनिगुंटा - वाडी - सोलापूर जं. - पुणे जं. - लोणावळा - पनवेल आणि पुढील योग्य मार्गावर वळवण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.