पणजी : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते प्रशांत नाईक, पुंडलिक धारगळकर, क्रुझ सिल्वा, श्री. बोंद्रे आणि संदेश तेळेकर देसाई यांनी अनुक्रमे कुंकळी, पेडणे, वेळ्ळी, थिवी आणि फातोर्डा मतदारसंघात ''परिवर्तन यात्रा'' मोहीम राबवली.
गोवा मुक्ती चळवळीत (Goa Liberation Movement) कुंकळ्ळीची मोठी भूमिका आहे. क्रांतिकारी निर्णय घेऊन आम आदमी पक्षाला सत्तेत आणण्यासाठी कुंकळ्ळीपासून सुरवात करूया, असे मेळाव्याला संबोधित करताना आपचे प्रशांत नाईक (Prashant Naik) म्हणाले.
पेडण्याला बदलाची गरज आहे आणि आप दिलेली आश्वासने पूर्ण करणारा एकमेव पक्ष आहे, असे पुंडलिक धारगळकर म्हणाले. मतदारसंघात बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण मोठे आहे, तसेच सरकारी नोकऱ्या (Government jobs) वाटपात पारदर्शकता नाही. या सर्व कारणांमुळे मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये निराशा झाली आहे, असे थिवी येथील मेळाव्यात बोंद्रे म्हणाले.
लोकांना आता भाजप आणि काँग्रेस (Congress) पक्ष नको आहे. मतदार खरोखरच ‘आप’च्या हमींच्या प्रतीक्षेत आहेत, असे आपचे उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई म्हणाले.
नोकऱ्यांपासून ते वैद्यकीय सेवेपर्यंत, सर्व काही आमदारांच्या प्रभावाखाली घडते. भाजप (BJP) आणि काँग्रेस त्याच्या कार्यकर्त्यांसाठी काम करत आहेत. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची नितांत गरज आहे आणि ती फक्त ‘आप’च देऊ शकते. स्मार्ट गावे बनवणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही आमच्या गावातील जलस्रोत आणि संस्कृती जपण्यासाठी काम करू, असे आप नेते क्रूझ सिल्वा यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.