Ganesh Usttav : सत्तरीतील गणेश मूर्तिकला संवर्धनात युवकांचे योगदान

कलावंतांची लगबग: म्हाऊसच्या चित्रशाळेला 180 वर्षांची परंपरा
Ganesh usttav
Ganesh usttavDainik Gomantak

यावर्षी चतुर्थी सण १९ सप्टेंबर रोजी आलेला आहे. श्रावण यंदा अधिक मास असल्याने चतुर्थी एक महिना पुढे गेली आहे. तरीही सत्तरी तालुक्यात गणेश चित्रशाळांमध्ये गणेश मूर्ती करण्यास आत्तापासूनच कलाकारांची लगबग सुरू झाली आहे. ज्येष्ठांनी सुरू केलेली परंपरा युवकही जपत आहेत. चतुर्थीचे वेध आत्तापासूनच लागले आहेत. सत्तरी तालुक्यात मूर्तिकला जपण्यात युवकांचाही सहभाग वाढला आहे.

म्हाऊस येथील रजत गावकर (२६) या युवकाने पूर्वजांनी सुरू केलेली गणेश चित्रशाळा संवर्धित केली आहे. आपल्या पणजोबांनी, आजोबा व काकांनी, वडिलांनी सुरू केलेली पारंपरिक गणेश मूर्ती बनविण्याची १८० वर्षांची परंपरा आजही रजतने जपली आहे.

Ganesh usttav
Pernem News : कामुर्ली-तुये फेरीबोट धक्क्याचे काम बंदच

पणजोबांनी सुरुवातीला लहान प्रमाणात मातीची गणपती मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पणजोबा, काका, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ही गणेश सेवा कलेद्वारे रजत जपत आहे. रजतच्या चित्रशाळेत भेट दिली असता गणेश मूर्ती घडवण्यात अगदी तल्लीन झालेला होता.

Ganesh usttav
Pernem Road Issues: तांबोसे- मोपा रस्ता बनलाय मृत्यूमार्ग, गलथान कारभारामुळे खड्ड्यांचे ग्रहण काही सुटेना

या कामात काकांचे मुलगे हनुमंत गावकर, जयंत गावकर, मामाचा मुलगा समीर माजिक आदी सहकार्य करीत आहेत. वडील सरकारी सेवेत असल्याने रात्रीची सेवा करतात. म्हाऊस, दाबे, झर्मे, केरी, पर्ये, सावर्डे, वेळगे, रावण, वेळगे, गोमळ, वेळूस, ब्रम्हाकरमळी, नानेली, नगरगाव, धावे, कुडशे, घोटेली केरी, मोर्ले, साखळी, डिचोली या गावात गणपती मूर्तींना मागणी आहे. सुरुवातीच्या काळात हाताने गणपती रंगविण्याचे काम करीत होतो.

Ganesh usttav
Pernem News : पेडणेतील ‘थीम पार्क’ला विरोध

पण गेली २० वर्षे कॉंप्रेसर मशीनव्दारे काम केले जाते. रजत प्रमाणे सत्तरीत अन्य गणेश मूर्तिकार गणपती बनविण्याच्या कामाला लागले आहेत, असे गावकर म्हणाला. सत्तरीत धावे, उस्ते, नगरगाव, बांबर, कुडशे, दाबोस आदी ठिकाणी गणेश चित्र शाळांत लगबग सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com