Pernem News : पेडणे तालुक्यातील कामुर्ली-तुये या जलमार्गावरील दोन्ही बाजूचे फेरीबोट धक्का (रॅम्प) उभारण्याचे काम गेल्या सहा महान्यांपासून बंद आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात फेरीबोटी चालविण्यास धोका संभवतो अशा आशयाचे पत्र कर्मचाऱ्यांनी नदीपरिवहन खात्याला लिहून ही फेरीबोट सेवा धोक्यात आल्याचे म्हटले आहे.
कामुर्ली ते तुये जलमार्गावरील फेरीबोट धक्क्याच्या कामाची वर्कऑर्डर सप्टेंबर २०२१ मध्ये देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने ज्या कंत्राटदारास हे काम दिले आहे, त्याने तब्बल दोन वर्षांनी काम सुरू केले. आता काम सुरू केले खरे पण केवळ पाण्यात लाकडाचे खांब उभारले आणि ते काम अर्धवट ठेवले.
जवळपास सहा महिन्यांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे फेरीबोटीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नदीपरिहन खात्याला धोक्याबाबत सतर्क केले आहे.विशेष म्हणजे कंत्राटदाराला खात्याने मे २०२३ मध्ये दहा लाख रुपये दिले आहेत, पण अजूनही काम सुरू झालेले नाही.
रायबंदरचे कामही त्यालाच
आश्चर्यजनक बाब म्हणजे याच कंत्राटदाराला तिसवाडी तालुक्यातील रायबंदर येथील फेरीबोट रॅम्प रुंदीकरणाचे ८० लाखांचे कामही दिले गेले आहे. परंतु आता संबंधित कंत्राटदारास रॅम्प बांधण्याचा अनुभव आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. फेरीबोटीतून दररोज शेकडो प्रवाशी येजा करतात. त्यामुळे धक्क्याचे काम त्वरित होणे आवश्यक असताना कंत्राटदाराकडून चालढकल होत आहे. आता या कामाला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.