
Vinu Mankad Trophy विनू मांकड करंडक 19 वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याने ‘ड’ गटातील मोहिमेची समाप्ती शुक्रवारी विजयाने केली. अखेरच्या साखळी लढतीत त्यांनी ओडिशाला पाच विकेट राखून हरविले. सामना पुदुचेरी येथे झाला.
गोव्याच्या विजयात यश कसवणकर याचे झुंजार अर्धशतक निर्णायक ठरले. त्याने 111 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने चिवट 67 धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी दिशांक मिस्कीन याच्यासमवेत 72, तर पाचव्या विकेटसाठी जीवनकुमार चित्तेम याच्यासह 41 धावांची भागीदारी केली.
त्यामुळे गोव्याने 5 बाद 144 धावा करून सामना जिंकला. त्यापूर्वी शिवांक देसाई याची प्रभावी गोलंदाजी, तसेच युवराज सिंग व कर्णधार पुंडलिक नाईक यांनी विभागून बाद केलेले पाच गडी यामुळे गोव्याने ओडिशाचा डाव 141 धावांत गुंडाळला.
पाच लढतीत तीन विजय
गोव्याने स्पर्धेतील पाच लढतीत तीन विजय नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला. त्यांनी अनुक्रमे अरुणाचल प्रदेश, सौराष्ट्र व ओडिशा या संघांना हरविले, तर राजस्थान व छत्तीसगडविरुद्ध पराभव पत्करला.
संक्षिप्त धावफलक
ओडिशा ः ३७.२ षटकांत सर्वबाद १४१ (गौतम गोपाळ ३६, श्रेयश भारद्वाज २९, संबित बेजा २१, पुंडलिक नाईक ८-०-४७-२, युवराज सिंग ९.२-१-४०-३, कौस्तुभ पिंगुळकर ६-१-१०-१, यश कसवणकर ८-०-२८-१, शिवांक देसाई ६-१-१६-३) पराभूत वि. गोवा ः ४५.२ षटकांत ५ बाद १४४ (दर्पण पागी ८, शंतनू नेवगी ७, विराज नाईक ५, यश कसवणकर ६७, दिशांक मिस्कीन ३३, जीवनकुमार चित्तेम नाबाद १६, रिजुल पाठक नाबाद ०, श्रीराज पटनाईक २-४१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.