Vaibhav Suryavanshi: 'सिक्सर किंग' वैभव सूर्यवंशीचा जलवा! आफ्रिकेच्या मैदानावर ठोकला कारकिर्दीतील सर्वात उत्तुंग षटकार; कमेंटेटरही निशब्द VIDEO

Vaibhav Suryavanshi Six Viral: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकाच नावाची चर्चा रंगली आहे, ते नाव म्हणजे अवघ्या 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी.
Vaibhav Suryavanshi Six Viral
Vaibhav SuryavanshiDainik Gomantak
Published on
Updated on

Vaibhav Suryavanshi Six Viral: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकाच नावाची चर्चा रंगली आहे, ते नाव म्हणजे अवघ्या 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या 'युथ वनडे' मालिकेत वैभवने केवळ आपल्या फलंदाजीनेच नव्हे, तर कल्पक नेतृत्वानेही सर्वांची मने जिंकली आहेत.

नियमित कर्णधार आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत भारतीय अंडर-19 संघाची धुरा सांभाळताना वैभवने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने ठोकलेला एक गगनचुंबी षटकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून आफ्रिकी कमेंटेटर्संनी त्याची तुलना आंतरराष्ट्रीय दिग्गजांशी केली.

कर्णधारपदाला साजेशी आक्रमक खेळी

दक्षिण आफ्रिकेने (South Africa) पहिल्यांदा फलंदाजी करताना 245 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य भारतीय संघासमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार वैभव सूर्यवंशीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेजे बॅसन डावातील पहिले ओव्हर टाकत असताना पाचव्या चेंडूवर वैभवने जो शॉट खेळला त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एका उसळत्या बाउन्सर चेंडूवर वैभवने इतका जबरदस्त 'हुक शॉट' मारला की चेंडू मैदानाबाहेर पडला. एका 14 वर्षांच्या मुलाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्टीवर असा ताकदवान शॉट मारणे हे कोणालाही चकित करणारे होते.

Vaibhav Suryavanshi Six Viral
Virat Kohli: विराट कोहलीची अचानक माघार! न्यूझीलंडविरूध्दच्या वनडे मालिकेपूर्वी चाहत्यांना धक्का

कमेंटेटरची प्रतिक्रिया व्हायरल

वैभवचा हा अभूतपूर्व शॉट पाहून दक्षिण आफ्रिकेचे कमेंटेटर्स स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. ते म्हणाले, "मी या मैदानावर आजवर भरपूर क्रिकेट पाहिले आहे. अनेक महान आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी येथे मोठे फटके मारले आहेत, पण एका 14 वर्षांच्या मुलाने मारलेला हा हुक शॉट मी पाहिलेला आजवरचा सर्वात मोठा षटकार आहे. सूर्यवंशीचा स्ट्राईक रेट आणि त्याचे टायमिंग खरोखरच विलक्षण आहे." या प्रतिक्रियेचा व्हिडिओ आता जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Vaibhav Suryavanshi Six Viral
Virat Kohli: नव्या वर्षाचा नवा विक्रम! 2026 च्या पहिल्याच मालिकेत किंग कोहली इतिहास रचण्यासाठी सज्ज

19 चेंडूत अर्धशतक आणि 'सिक्सर किंग'चा अवतार

वैभवची ही खेळी केवळ एका षटकारापुरती मर्यादित नव्हती. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे अक्षरशः वाभाडे काढले. त्याने अवघ्या 19 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी वैभवने 24 चेंडूंमध्ये 68 धावांची झंझावाती खेळी खेळली. विशेष म्हणजे, या खेळीत त्याने फक्त 1 चौकार लगावला, मात्र तब्बल 10 उत्तुंग षटकार ठोकले. 283.33 च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या वैभवच्या या वादळी खेळीमुळे भारताने हा सामना 8 गडी राखून सहज जिंकला. या कामगिरीसाठी त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.

Vaibhav Suryavanshi Six Viral
Virat Kohli Record: कोहलीचा धमाका! सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडीत काढत रचला इतिहास; 16 हजारी क्लबमध्ये दिमाखदार एन्ट्री Watch Video

मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी

वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-19 संघाने मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. वयाने लहान असूनही मैदानावरील त्याचे निर्णय आणि फलंदाजीतील परिपक्वता पाहून भारताला भविष्यातील एक मोठा सुपरस्टार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. वैभवने ज्या पद्धतीने दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याचा सामना केला, ते पाहता आगामी काळात तो वरिष्ठ भारतीय संघातही (Team India) लवकरच स्थान मिळवेल, असे भाकीत क्रिकेट तज्ज्ञांनी वर्तवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com