Virat Kohli: विराट कोहलीची अचानक माघार! न्यूझीलंडविरूध्दच्या वनडे मालिकेपूर्वी चाहत्यांना धक्का

Virat Kohli vijay hazare trophy: टीम इंडियाचा रन-मशीन विराट कोहली ६ जानेवारी रोजी रेल्वेविरुद्ध होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक संमिश्र बातमी समोर येत आहे. एकीकडे टीम इंडियाचा रन-मशीन विराट कोहली ६ जानेवारी रोजी रेल्वेविरुद्ध होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे दोन धडाकेबाज खेळाडू मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. विराट कोहली आता थेट न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतच खेळताना दिसेल.

विराट कोहलीची अचानक माघार

विराट कोहलीने बीसीसीआयच्या आदेशानुसार १५ वर्षांनंतर घरगुती क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. दिल्लीकडून खेळताना त्याने आंध्र प्रदेशविरुद्ध १३१ आणि गुजरातविरुद्ध ७७ धावांची जबरदस्त खेळी केली होती.

यानंतर तो तिसरा सामना रेल्वेविरुद्ध खेळेल, अशी पुष्टी खुद्द डीडीसीए (DDCA) अध्यक्ष रोहन जेटली यांनी दिली होती. मात्र, आता दिल्लीचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी तो या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. विराटने यापूर्वीच दोन सामन्यांचा कोटा पूर्ण केल्याने त्याने वर्कलोड मॅनेजमेंटसाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.

Virat Kohli
Goa Cruise Tourism: 67500 पर्यटक गोव्यात दाखल होणार! सागरी पर्यटन हंगामाचा 2रा टप्पा; 'क्रिस्टल सिमफोनी' पोचणार मुरगाव बंदरात

विराट कोहली नसला तरी, ६ जानेवारीचे सामने भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहेत. पंजाबचा कर्णधार शुभमन गिल आजारपणामुळे मागील सामन्यातून बाहेर होता, तो आता गोवा संघाविरुद्ध पुनरागमन करणार आहे.

दुसरीकडे, गेल्या ३ महिन्यांपासून दुखापतीमुळे बाहेर असलेला श्रेयस अय्यर मुंबईच्या संघात परतला आहे. हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात तो केवळ खेळणारच नाही, तर मुंबईचे नेतृत्वही करणार आहे. श्रेयस अय्यरला न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघात 'फिटनेस क्लिअरन्स'च्या अटीवर स्थान मिळाले आहे, त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी 'लिटमस टेस्ट' ठरणार आहे.

Virat Kohli
Goa Cruise Tourism: 67500 पर्यटक गोव्यात दाखल होणार! सागरी पर्यटन हंगामाचा 2रा टप्पा; 'क्रिस्टल सिमफोनी' पोचणार मुरगाव बंदरात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका ११ जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होत आहे. या मालिकेसाठी शुभमन गिलकडे कर्णधारपद तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे देखील या मालिकेचा भाग आहेत. कोहलीने घरगुती क्रिकेटमध्ये स्वतःला पूर्णपणे मॅच-फिट केले असून, आता त्याचे संपूर्ण लक्ष न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करण्यावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com