
पणजी: डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने भेदक मारा करताना पाच विकेट टिपल्या, त्यामुळे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या डॉ. (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट सामन्यात गोव्याने महाराष्ट्राचा पहिला डाव १३६ धावांत गुंडाळला. त्यानंतर अभिनव तेजराणा याच्या अर्धशतकानंतरही गोव्याची दिवसअखेर ५ बाद १५८ अशी घसरगुंडी उडाली.
स्पर्धेतील चार दिवसीय सामन्यास मंगळवारपासून अळूर येथे सुरवात झाली. पहिल्या दिवसअखेर गोव्यापाशी आता २२ धावांची आघाडी आहे. गोव्याने नाणेफेक जिंकून नवोदित खेळाडूंना संधी दिलेल्या महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीस पाचारण केले.
अर्जुन विदर्भाविरुद्धच्या लढतीत खेळला नव्हता, महाराष्ट्राविरुद्ध धारदार मारा करताना सचिन तेंडुलकरच्या मुलाने ३६ धावांत ५ गडी टिपले. महाराष्ट्रातर्फे मेहुल पटेल याने अर्धशतक करताना ५४ धावा नोंदविल्या. अर्जुनच्या तडाख्याने महाराष्ट्राची ५ बाद २२ धावा अशी दयनीय स्थिती झाली होती.
गोव्याच्या दुसऱ्या डावात अभिनव तेजराणा याने पुन्हा एकदा चमक दाखविली. तीन डावांतील दुसरे अर्धशतक करताना त्याने ९८ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावा केल्या;
पण इतर फलंदाज मोठी धावसंख्या रचू शकले नाही, परिणामी गोव्याला पूर्ण वर्चस्व राखता आले नाही. अभिनवने सुयश प्रभुदेसाई याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र, पहिला डाव : ४१ षटकांत सर्वबाद १३६ (मेहुल पटेल ५४, मिझाँ सय्यद १९, अक्षय वाईकर १७, अर्जुन तेंडुलकर १४-४-३६-५, लखमेश पावणे ६-०-३५-२, मोहित रेडकर २-०-११-१, दीपराज गावकर ३-०-११-०, दर्शन मिसाळ १२-२-३७-१, ललित यादव २-१-१-०, विकास सिंग २-०-५-१).
गोवा, पहिला डाव : ४६ षटकांत ५ बाद १५८ (आर्यन नार्वेकर ०, सुयश प्रभुदेसाई २१, अभिनव तेजराणा ७७, ललित यादव १६, दर्शन मिसाळ नाबाद ११, दीपराज गावकर ११, मोहित रेडकर नाबाद १२, निकित धुमाळ २-२२, नदीम शेख १-३६, अक्षय वाईकर १३-२-६९-२).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.