Goa Cricket Coach: गोवा सीनियर महिला क्रिकेट प्रशिक्षकपदी नेहा तंवर! T-20 स्पर्धेने मोहिमेस होणार सुरवात

Neha Tanwar coach: संभाव्य संघातील खेळाडू सध्या दिल्ली येथे सराव करत असून हा संघ अहमदाबाद येथील निमंत्रित संघांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळेल. त्यानंतर गोव्याचा संघ सीनियर महिला टी-२० स्पर्धेत खेळेल.
Neha Tanwar coach
Neha Tanwar coachDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आगामी देशांतर्गत क्रिकेट मोसमातील सीनियर महिला क्रिकेट स्पर्धेसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) भारताची माजी आंतरराष्ट्रीय बॅटर नेहा तंवर यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ पुढील महिन्यात टी-२० स्पर्धेने मोहिमेस सुरवात करेल.

जीसीए व्यवस्थापकीय समितीने निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी नेहा यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. संभाव्य संघातील खेळाडू सध्या दिल्ली येथे सराव करत असून हा संघ अहमदाबाद येथील निमंत्रित संघांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळेल. त्यानंतर गोव्याचा संघ बीसीसीआय सीनियर महिला टी-२० स्पर्धेत खेळेल.

दिल्लीतर्फे दीर्घकाळ क्रिकेट खेळलेल्या नेहा या अनुभवी क्रिकेटपटू असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) ‘हायब्रीड लेवल टू’ प्रशिक्षक आहेत. हा अभ्यासक्रम त्यांनी २०२१ मध्ये पूर्ण केला होता. त्यानंतर पंजाब, तसेच दिल्ली संघटनेच्या सीनियर महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून ३९ वर्षीय नेहा यांनी जबाबदारी निभावली.

Neha Tanwar coach
Goa Cricket: दिल्ली कॅपिटलचा 'हा' आक्रमक फलंदाज खेळणार गोव्याकडून, अष्टपैलू खेळाडूमुळे वाढली ताकत

गोव्याचा सीनियर महिला क्रिकेट संघ २०२५ २६ मोसमात टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. टी-२० स्पर्धेत गोव्याचा एलिट ड गटात समावेश आहे. उत्तराखंड, रेल्वे, झारखंड, दिल्ली, आसाम, चंडीगड हे गटातील अन्य संघ आहेत. गोव्याच्या गटातील सामने छत्तीसगडमधील रायपूर येथे खेळले जातील. गोव्याचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडविरुद्ध होईल. सीनियर एकदिवसीय स्पर्धेत गोव्याचा महिला संघ क गटात खेळेल. या गटातील सामने ६ फेब्रुवारीपासून झारखंडमधील रांची येथे खेळले जातील. रेल्वे, दिल्ली, हैदराबाद, केरळ, पंजाब, त्रिपुरा व सौराष्ट्र हे गोव्याच्या गटातील अन्य संघ आहेत.

Neha Tanwar coach
Thimmappiah Cricket: गोव्याचा मोसमपूर्व स्पर्धात्मक ‘सराव’ सुरु! विदर्भ, महाराष्ट्राशी भिडणार

खेळताना ‘सुपर मॉम’ ओळख

नेहा यांनी मातृत्वानंतरही क्रिकेट खेळणे कायम राखले, त्यामुळे त्या ‘सुपर मॉम’ म्हणूनही ओळखल्या गेल्या. २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये क्रिकेटमधून दूर होण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या जन्मानंतर दीड वर्षांनी त्यांनी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि २०१७ मध्ये त्यांची भारतीय महिला क्रिकेट संघातही निवड झाली होती. या दरम्यान भारत अ संघातूनही त्या खेळल्या होत्या. पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरताना त्यांनी तब्बल वीस किलो वजनही कमी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com