Ranji Trophy: 'करूण नायर' भिडणार गोव्यासोबत! रणजी संघाची कसोटी; बलाढ्य कर्नाटकविरुद्ध रंगणार लढत

Goa vs Karnataka: कर्नाटकला सौराष्ट्रविरुद्ध अनिर्णित लढतीत पहिल्या डावातील आघाडी फक्त चार गुणांनी हुकली. त्यामुळे त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले.
Karun Nair Record
Karun Nair RecordDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) शिमोगा येथील नवुले स्टेडियमवर रणजी करंडक एलिट ब क्रिकेट चार दिवसीय लढतीत शनिवारपासून (ता. २५) गोव्याची बलाढ्य कर्नाटकविरुद्ध कसोटी लागेल.

गोव्याने स्पर्धेतील पहिल्या लढतीत चंडीगडला डाव व ७५ धावांनी नमविले आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सध्या उंचावलेला असला, तरी कर्नाटकविरुद्ध शिमोगा येथील परिस्थिती निश्चितच वेगळी असेल.

कर्नाटकला सौराष्ट्रविरुद्ध अनिर्णित लढतीत पहिल्या डावातील आघाडी फक्त चार गुणांनी हुकली. त्यामुळे त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. त्याची भरपाई ते निश्चितच गोव्याविरुद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असतील. गोव्याने चंडीगडविरुद्ध बोनस गुण प्राप्त केल्यामुळे त्यांच्या खाती सध्या सात गुण आहेत.

कर्नाटकच्या संघात मयंक अगरवाल, करुण नायर असे फलंदाजीतील अनुभवी आहेत, तर गोलंदाजीत वैशाख विजयकुमार, विद्वथ कावेरप्पा यांच्यामुळे, तसेच अष्टपैलू श्रेयस गोपाळ यांच्यामुळे यजमान संघाचे पारडे जड असेल.

एम. व्यंकटेश हा गोलंदाजही गोव्याला सतावू शकतो. चंडीगडविरुद्ध गोव्याच्या अभिनव तेजराणा (२०५) व ललित यादव (२१३) यांनी द्विशतके ठोकताना चौथ्या विकेटसाठी ३०९ धावांची भागीदारी केली होती. कर्नाटकच्या धारदार प्रभावी माऱ्यासमोर गोव्याच्या फलंदाजांचा निश्चितच कस लागेल.

Karun Nair Record
Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

मैदानावर उतरण्यापूर्वी...

एकूण सामने : १९, गोवा विजयी : १, कर्नाटकचे विजय : १३, अनिर्णित : ५

कर्नाटकात झालेले सामने : १०, कर्नाटक विजयी : ९, अनिर्णित : १

Karun Nair Record
Ranji Trophy: विजयासाठी गोव्याला 7 विकेटची गरज! फॉलोऑननंतर चंदीगडचा चिवट प्रतिकार; अर्जुनची झुंझार फलंदाजी

स्नेहल, कौशिक गोव्याच्या संघात

कर्नाटकविरुद्धच्या लढतीसाठी गोव्याच्या संघात कर्णधार स्नेहल कवठणकर व कर्नाटकी पाहुणा वेगवान गोलंदाज वासुकी कौशिक यांचा समावेश झाला आहे, त्यामुळे चंडीगडविरुद्ध खेळलेल्या अकरा सदस्यीय संघात दोन बदल असतील हे नक्की. मागील लढतीत दीपराज गावकर याने स्नेहलच्या अनुपस्थितीत नेतृत्व केले होते. आता कर्णधार या नात्यानेही स्नेहलचे पुनरागमन असेल.

प्राप्त माहितीनुसार, शिमोगा येथे शुक्रवारी पावसाळी वातावरण होते. खेळपट्टीही आच्छादलेली होती. खेळपट्टीकडून वेगवान-मध्यमगती गोलंदाजांना साह्य मिळण्याचे संकेत आहेत, त्यामुळे गोव्याच्या संघात वेगाने मारा करणारे तिघे गोलंदाज असल्यास नवल वाटू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com