
पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटातील मोहिमेस विजयाने सुरवात करण्यासाठी गोव्याला प्रतिस्पर्धी चंडीगडच्या बाकी सात विकेट्सची आवश्यकता आहे. त्यांच्यापाशी अजून २७० धावांची आघाडी असून फॉलोऑननंतर पाहुण्या संघाने दुसऱ्या डावात चिवट प्रतिकार केल्यामुळे यजमानांना आता अखेरच्या चौथ्या दिवशी शनिवारी मैदानात उतरावे लागेल.
पहिल्या डावातील द्विशतकवीर ललित यादव गोलंदाजीतही चमकला. या ऑफस्पिनरने १७ धावांत ३ गडी टिपले, तर अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळने २७ धावांत ३ गडी बाद केले. त्यामुळे गोव्याच्या ५६६ धावांना उत्तर देताना चंडीगडचा पहिला डाव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी उपाहारानंतर १३७ धावांत संपला.
यामुळे गोव्याला ४२९ धावांनी प्रचंड मोठी आघाडी मिळाली. चंडीगडचा आठव्या क्रमांकावरील जगजीतसिंग संधू याने ३१ धावांची खेळी केल्यामुळे त्यांना ७ बाद ९५ वरुन सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडता आला. दुसऱ्या डावात २ बाद १३ वरून पाहुण्या संघाने खिंड लढविली.
रणजी करंडक पदार्पण करणारा सलामीचा २४ वर्षीय फलंदाज अर्जुन आझाद याने झुंझार नाबाद ७६ धावा केल्या, त्यामुळे तिसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा चंडीगडने ३ बाद १५९ धावा केल्या होत्या. अर्जुन याने भागमेंदर लाथेर (३८) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची, तर चौथ्या विकेटसाठी अंकित कौशिक (नाबाद ३८) याच्यासह ६२ धावांची अभेद्य भागीदारी केली.
गोवा, पहिला डाव ः ५६६
चंडीगड, पहिला डाव (१ बाद ३४ वरुन) ः ५३.३ षटकांत सर्वबाद १३७ (मनन वोहरा २३, भागमेंदर लाथेर २७, जगजीतसिंग संधू ३१, निशुंक बिर्ला १२, अर्जुन तेंडुलकर ११-३-३१-१, दर्शन मिसाळ १४-६-२७-३, हेरंब परब ६-२-२५-१, मोहित रेडकर १५-५-३६-१, ललित यादव ७.३-२-१७-३).
चंडीगड, दुसरा डाव ः ४० षटकांत ३ बाद १५९ (अर्जुन आझाद नाबाद ७६, भागमेंदर लाथेर ३८, अंकित कौशिक नाबाद ३८, अर्जुन तेंडुलकर ९-२-३५-१, दर्शन मिसाळ १४-१-६१-१, मोहित रेडकर ७-०-३०-०, ललित यादव ९-१-२७-१, अभिनव तेजराणा १-०-२-०).
विरुद्ध झारखंड (२०१०-११) ः गोवा - ५८३, झारखंड - २६७ व १८९; गोवा डाव व १२७ धावांनी विजयी
विरुद्ध जम्मू-काश्मीर (२०१८-१९) ः गोवा - ९ बाद ४६८ घोषित, जम्मू-काश्मीर - २७१ व ५ बाद २४२; सामना अनिर्णित
विरुद्ध अरुणाचल प्रदेश (२०१९-२०) ः गोवा - २ बाद ५८९ घोषित, अरुणाचल प्रदेश - ८३ व १७०; गोवा डाव व ३३६ धावांनी विजयी
विरुद्ध मणिपूर (२०२४-२५) ः गोवा - ३७६ व १ बाद ७६, मणिपूर - ९८ व ३५३; गोवा ९ विकेटने विजयी
विरुद्ध चंडीगड (२०२५-२६) ः गोवा - ५६६, चंडीगड - १३७ व ३ बाद १५९ (सामना सुरू)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.