Suyash Prabhudesai: पायाच्या दुखापतीनं केला घात! मिझोरामविरुद्धच्या सामन्याला गोव्याचा स्टार मुकणार
Suyash PrabhudesaiDainik Gomantak

Suyash Prabhudesai: पायाच्या दुखापतीनं केला घात! मिझोरामविरुद्धच्या सामन्याला गोव्याचा स्टार मुकणार

Suyash Prabhudesai Leg Injury: गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघातील प्रमुख फलंदाज सुयश प्रभुदेसाई पायाच्या दुखापतीमुळे मिझोरामविरुद्धच्या पुढील सामन्यासही मुकणार आहे.
Published on

पणजी: गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघातील प्रमुख फलंदाज सुयश प्रभुदेसाई पायाच्या दुखापतीमुळे मिझोरामविरुद्धच्या पुढील सामन्यासही मुकणार आहे. नागालँडविरुद्धच्या लढतीत तो याच कारणास्तव खेळला नव्हता. त्याच्या जागी सलामीचा डावखुरा फलंदाज ईशान गडेकर याचा संघात समावेश केल्याची माहिती जीसीएने दिली.

गोव्याचा प्लेट विभागातील चौथा साखळी सामना सहा नोव्हेंबरपासून मिझोरामविरुद्ध अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर खेळला जाईल. गोव्याने अनुक्रमे मणिपूर, सिक्कीम व नागालँडला नमवून गटात सर्वाधिक १९ गुणांची कमाई केली. सलग तीन विजयामुळे गोव्याची प्लेट विभाग अंतिम फेरी आणि पुढील मोसमातील एलिट गट पात्रताही जवळपास निश्चित झाली आहे.

Suyash Prabhudesai: पायाच्या दुखापतीनं केला घात! मिझोरामविरुद्धच्या सामन्याला गोव्याचा स्टार मुकणार
Goa Cricket: सलग दुसऱ्या वर्षी गोव्याचा 'हा' खेळाडू खेळणार दुलीप करंडक; २०२२ पासून आहे आरसीबी सदस्य

नागालँडला मणिपूरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पर्वरी येथे दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना पायाला दुखापत झाली होती. त्या लढतीत त्याने पहिल्या डावात १२० धावांची खेळी केली होती. नंतर सिक्कीमविरुद्ध रंगपो येथे खेळला व धावबाद होण्यापूर्वी ५४ धावा केल्या. मात्र पणजी जिमखान्यावरील नागालँडविरुद्धच्या लढतीत तो दुखापत चिघळू नये या कारणास्तव खेळला नाही. सलामीला त्याची जागा राहुल मेहता याने घेतली.

Suyash Prabhudesai: पायाच्या दुखापतीनं केला घात! मिझोरामविरुद्धच्या सामन्याला गोव्याचा स्टार मुकणार
Suyash Prabhudessai: अर्जुनमुळे 200 धावा ठोकणारा गोव्याचा हा पठ्या झाकोळला

आता मिझोरामविरुद्धच्या लढतीतूनही सुयशने माघार घेतली असल्याचे गोवा क्रिकेट असोसिएशनकडून (जीसीए) सांगण्यात आले. गोव्याच्या १७ सदस्यीय संघात ईशानची निवड झाल्याची माहिती देण्यात आली. निवडण्यात आलेला २७ वर्षीय ईशान सुरवातीच्या तीन सामन्यांसाठी संघात नव्हता. गतमोसमात रणजी एलिट गटातील आठ डावांत विशेष चमक दाखवू न शकलेल्या ईशानला वगळण्यात आले होते, आता त्याला संघात जागा मिळविण्यासाठी संधी मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com