Duleep Trophy: सुयशच्या निवडीची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव रोहन गावस देसाई यांनी दिली
Suyash PrabhudesaiCanva, Dainik Gomantak

Goa Cricket: सलग दुसऱ्या वर्षी गोव्याचा 'हा' खेळाडू खेळणार दुलीप करंडक; २०२२ पासून आहे आरसीबी सदस्य

Duleep Trophy: सुयशच्या निवडीची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव रोहन गावस देसाई यांनी दिली
Published on

पणजी: गोव्याचा हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई यांचा दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत समावेश करण्यात आला. या स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी २६ वर्षीय क्रिकेटपटूस संधी मिळाली.सध्या सुरू असलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामने १२ सप्टेंबरपासून खेळले जातील.

सुयशच्या निवडीची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव रोहन गावस देसाई यांनी दिली. नोव्हेंबर २०१८ मध्ये रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केल्यापासून सुयश ३३ सामने खेळला असून ४६.३२च्या सरासरीने पाच शतके व १२ अर्धशतकांसह २३१६ धावा केल्या आहे. सुयशने मागील दोन रणजी मोसमातील एलिट गटात गोव्यातर्फे फलंदाजीत लक्षणीय कामगिरी बजावली.

२०२२-२३ मोसमात त्याने ४२.८१च्या सरासरीने ४७१ धावा केल्या, तर २०२३-२४ मोसमात तीन शतके व दोन अर्धशतकांच्या मदतीने सात सामन्यांत ५७.२५च्या सरासरीने ६८७ धावा केल्या. आयपीएल स्पर्धेत सुयश २०२२ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा सदस्य आहे.

Duleep Trophy: सुयशच्या निवडीची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव रोहन गावस देसाई यांनी दिली
Goa Cricket: ..आता छत्तीसगडचे आव्हान! पहिल्या सामन्यात गोवा संघाची हाराकिरी

गतमोसमातील दुलीप करंडक स्पर्धेतील अंतिम लढतीसाठी सुयशची दक्षिण विभाग संघात निवड झाली होती, मात्र त्याला अंतिम अकरा सदस्यीय संघात स्थान मिळाले नव्हते. यावेळी सुयशला पुन्हा दुलीप करंडक स्पर्धेसाठी संधी मिळाल्यानंतर जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी सांगितले, की ``प्रतिष्ठेच्या दुलीप करंडक स्पर्धेत प्रतिभावान सुयश प्रभुदेसाईच्या समावेशाची घोषणा अत्यंत अभिमानाने करत आहे.

हे यश त्याची मेहनत, समर्पण आणि क्रिकेटप्रती उत्कटतेचा दाखला आहे. ही संधी त्याला नवीन उंचीवर नेऊ शकेल आणि संघाला गौरव मिळवून देईल.``

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com