Pramod Yadav
गोव्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफित सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने शंभर धावा केल्या.
राजस्थान विरोधात सुरू असलेल्या याच सामन्यात सुयश प्रभूदेसाईने देखील विक्रमी धावांची खेळी केली आहे.
मुळचा गोव्याचा असलेल्या सुयशने 212 धावा ठोकल्या आहेत.
पण, याच सामन्यात अर्जुनने केलेल्या पदार्पणाच्या शतकामुळे सुयशची खेळी काहीशी झाकोळली.
गोव्यासाठी क्रिकेट खेळणारा सुयश रॉयल चॅलेजर्स बंगळूरूसाठी आयपीएलमधून खेळतो.
सुयशने 416 चेंडूच्या मदतीने 212 धावा केल्या आहेत.
सुयशने केलेल्या उत्कृष्ट खेळीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील कौतुक केले आहे.