Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याची T20 क्रिकेटमधील कामगिरीत घसरण; सहापैकी चार सामन्यांत पराभव, आता 'वन-डे'चे आव्हान

Goa T20 Cricket Team: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील मागील दोन मोसमातील गोव्याच्या कामगिरीशी तुलना करता यंदा घसरण पाहायला मिळाली. हैदराबाद येथे ई गटात खेळताना गोव्याने सहापैकी चार सामने गमावल्याने पाच मोसमापूर्वीची पुनरावृत्ती झाली.
Syed Mushtaq Ali Trophy 2024
Goa Vs NagalandDainik Gomantak
Published on
Updated on

Syed Mushtaq Ali Trophy 2024 Goa Cricket Team Performance

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील मागील दोन मोसमातील गोव्याच्या कामगिरीशी तुलना करता यंदा घसरण पाहायला मिळाली. हैदराबाद येथे ई गटात खेळताना गोव्याने सहापैकी चार सामने गमावल्याने पाच मोसमापूर्वीची पुनरावृत्ती झाली.

यंदा टी-२० स्पर्धेत गोव्याला सलग चार पराभव स्वीकारावे लागले, नंतर महाराष्ट्र व नागालँडविरुद्ध जिंकल्यामुळे थोडाफार लौकिक राखता आला. यंदा गोव्याला मुंबई, सेनादल, आंध्र, केरळ या मातब्बर संघांकडून हार पत्करावी लागली. यापूर्वी २०१९-२० मोसमात गोव्याने सहापैकी चार सामने गमावले होते. तुलनेत २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये गोव्याने प्रत्येकी चार सामने जिंकत उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली होती.

Syed Mushtaq Ali Trophy 2024
Goa Politics: 'विरोधकांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा'! मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ भाजपचा पलटवार

रणजी करंडक स्पर्धेच्या प्लेट गटात कमजोर संघांविरुद्ध पाचही साखळी सामने जिंकलेल्या गोव्याची टी-२० स्पर्धेत बलाढ्य संघांविरुद्ध डाळ शिजली नाही. आता ते २१ डिसेंबरपासून जयपूर येथे विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत खेळतील. या गटात मणिपूर एकमेव कमकुवत संघ आहे. हरियाना, गुजरात, उत्तराखंड, ओडिशा, झारखंड, आसाम आदी संघ प्रबळ आहेत.

Syed Mushtaq Ali Trophy 2024
Tiger Attack: ..अचानक समोर आला वाघ! हल्ला करणार इतक्यात; चोर्ला घाटातील थरारक प्रसंग वाचा

सुयश, फेलिक्स अव्वल

टी-२० स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीत फलंदाजीत सुयश प्रभुदेसाई, तर गोलंदाजीत फेलिक्स आलेमाव गोव्यातर्फे अव्वल ठरले. सुयशने सहा सामन्यांतील सहा डावात १५०ची स्ट्राईक रेट राखत ६७.५०च्या सरासरीने चार अर्धशतकांसह २७० धावा केल्या. फेलिक्सने तीन सामन्यांतील तीन डावात १०.३३ची सरासरी आणि ८.४५च्या इकॉनॉमी रेटने नऊ गडी बाद केले. नागालँडविरुद्ध डावात पाच गडी बाद करताना गोमंतकीय क्रिकेटमधील ऐतिहासिक हॅटट्रिकही नोंदीत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com