Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mohit Redkar Dropped From Goa Ranji Trophy Team: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच लढतीत बडोदा संघाकडून गोव्याला डाव व १३५ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला.
Mohit Redkar Dropped From Goa Ranji Trophy Team
Ranji Trophy 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच लढतीत बडोदा संघाकडून गोव्याला डाव व १३५ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला, त्यानंतर पुढील सामन्यासाठी संघातील मोहित रेडकर व दीपराज गावकर या अनुभवी अष्टपैलूंना गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) सीनियर निवड समितीने डच्चू दिला.

गोव्याचे एलिट अ गटातील पुढील दोन सामने अवे मैदानावर आहेत. उत्तर प्रदेशविरुद्ध कानपूर येथे १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत, तर विदर्भाविरुद्ध नागपूर येथे २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत गोव्याचा सामना होईल. कानपूर येथील लढतीसाठी गोव्याचा संघ गुरुवारी (ता. १५) रवाना होईल. या दौऱ्यासाठी मोहित व दीपराज यांच्या जागी वेगवान गोलंदाज विजेश प्रभुदेसाई व हेरंब परब यांची निवड करण्याची आल्याची माहिती जीसीएतील विश्वसनीय सूत्राने दिले. हे दोघेही सोळा सदस्यीय संघात पुनरागमन करत आहेत.

Mohit Redkar Dropped From Goa Ranji Trophy Team
Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

मोहित व दीपराज यांना अष्टपैलू या नात्याने चांगली संधी होती, पण ते विश्वासास पात्र ठरू शकले नाहीत, असे मत व्यक्त झाले. बाकी सामन्यात संघातील इतर अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीकडे निवड समिती बारकाईने लक्ष ठेवून असेल, ते अपयशी ठरल्यास त्यांना वगळून नवोदितांना पाचारण करण्याचे ठरले, अशी माहिती सूत्राने दिली.

बडोद्याविरुद्ध ऑफस्पिनर मोहितने ४१ षटके गोलंदाजी टाकताना १२० धावांत ३ गडी बाद केले. याच खेळपट्टीवर बडोद्याचा ऑफस्पिनर महेश पिठिया व डावखुरा फिरकी गोलंदाज भार्गव भट यांनी दोन्ही डावांत मिळून एकत्रित १८ गडी बाद केले. फलंदाजीत मोहितने चार व शून्य धावा केल्या. दीपराज संघातील अनुभवी अष्टपैलू आहे. त्याला वारंवार संधी देऊनही तो गुणवत्तेला न्याय देऊ शकलेला नाही, असे निवड समितीला वाटत असल्याचे सूत्राने नमूद केले. बडोद्याविरुद्ध दीपराजने अनुक्रमे १८ व शून्य धावा केल्या, तर मध्यमगती गोलंदाजीत आठ षटकांत ३५ धावा मोजल्या, पण तो गडी बाद करू शकला नाही.

Mohit Redkar Dropped From Goa Ranji Trophy Team
Goa Politics: गोव्याची माणुसकी हरवतेय? खरगेंच्या ताफ्याला झालेल्या विरोधाने ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com