Ranji Trophy: रणजी करंडकात गोव्यावर पराभवाचे संकट; विदर्भाची 222 धावांची आघाडी, डावाने पराभव टाळण्याचे आव्हान

Goa vs Vidarbha Ranji Trophy: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी गोव्याच्या फलंदाजांची सामन्याच्या अखेरच्या चौथ्या दिवशी गुरुवारी ‘कसोटी’ लागणार आहे.
Goa vs Vidarbha Ranji Trophy
Ranji TrophyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी गोव्याच्या फलंदाजांची सामन्याच्या अखेरच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (ता. २९) ‘कसोटी’ लागणार आहे. दुसऱ्या डावात त्यांची १ बाद ४१ अशी स्थिती असून डावाचा मारा टाळण्यासाठी संघर्ष करावा लागेल. विदर्भाने पहिल्या डावात २२२ धावांची मोठी आघाडी संपादली.

जामठा-नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडियमवर एलिट अ गट सामना सुरू आहे. सलग दुसऱ्या डावात सुयश प्रभुदेसाई (१ व ६ धावा) अपयशी ठरल्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर गोव्याला मंथन खुटकर (२४) व कर्णधार अभिनव तेजराणा (८) या नाबाद फलंदाजांनी सावरले. गोव्याचा संघ अजून १८१ धावांनी मागे आहे.

Goa vs Vidarbha Ranji Trophy
Goa Politics: निवडणुकीची तारीख जाहीर होताच मगो 'पत्ते' उघडणार! युती, जागावाटपाचा निर्णय संसदीय समितीकडे

त्यापूर्वी, विदर्भाने दुसऱ्या दिवसअखेरच्या ३ बाद २१७ वरून पहिला डाव ८ बाद ४४२ धावांवर घोषित केला. त्यांचा ‘पाहुणा’ दिल्लीकर फलंदाज ध्रुव शोरे याने शानदार दीडशतक नोंदविताना २९१ चेंडूंत १३ चौकार व एका षटकारासह १६८ धावा केल्या. गोव्याचा डावखुरा गोलंदाज दर्शन मिसाळने शोरे याला त्रिफळाचीत बाद केल्यानंतर विदर्भाने डाव घोषित केला.

३४ वर्षीय ध्रुव याने ८०व्या प्रथम श्रेणी सामन्यात सोळावे शतक झळकावले. त्याने अगोदर जखमी निवृत्ती झालेला अक्षय वाडकर व नंतर हर्ष दुबे यांच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी एकूण १८० धावांची भर टाकली. गोव्याचा २५ वर्षीय वेगवान गोलंदाज ऋत्विक नाईक याने विदर्भाचे पाच गडी ७० धावांत बाद करून कारकिर्दीत प्रथमच अशी कामगिरी साधली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : २२०

विदर्भ, पहिला डाव (३ बाद २१७ वरून) : १३४.२ षटकांत ८ बाद ४४२ घोषित (ध्रुव शोरे १६८, दानिश मालेवार ५६, अक्षय वाडकर नाबाद ६३, हर्ष दुबे २२,

वासुकी कौशिक २५-१०-४२-३, ऋत्विक नाईक २६-२-७०-५, शुभम तारी २१-१-७५-०, यश

कसवणकर १६-०-६९-०, दर्शन मिसाळ ३१.२-१-१०९-१, ललित यादव १४-१-५०-०, सुयश प्रभुदेसाई १-०-३-०).

गोवा, दुसरा डाव : २३ षटकांत १ बाद ४१ (सुयश प्रभुदेसाई ६, मंथन खुटकर नाबाद २४, अभिनव तेजराणा नाबाद ८, नचिकेत भुते १-४).

Goa vs Vidarbha Ranji Trophy
Goa Agriculture: सत्तरीत सुपारीच्या तोडणीला जोर; कुशल कामगारांची धावपळ, दरवाढीची मागणी

‘जीसीए’तर्फे दर्शनचे अभिनंदन

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील कारकिर्दीत २०० गडी बाद दर्शन मिसाळचे उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) अध्यक्ष महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये, खजिनदार अब्दुल माजिद आणि संपूर्ण व्यवस्थापकीय समितीने अभिनंदन केले असून पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com