GOA vs UP: गोव्याचा युवा महिला संघ पुन्हा पराभूत, हर्षिताचे अर्धशतक व्यर्थ; उत्तर प्रदेश पाच विकेटने विजयी

Goa Cricket Team: गोव्याच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाची कर्णधार हर्षिता यादव हिने झुंझार अर्धशतक नोंदविताना ७७ धावांची खेळी केली
GOA vs UP
GOA vs UPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाची कर्णधार हर्षिता यादव हिने झुंझार अर्धशतक नोंदविताना ७७ धावांची खेळी केली, मात्र ती व्यर्थ ठरली. उत्तर प्रदेशने एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेतील एलिट अ गट सामन्यात १३९ धावांचे लक्ष्य पाच विकेटच्या मोबदल्यात पार केले.

बडोदा येथील इन्फिप्रो स्पोर्टस क्लब मैदानावर सोमवारी झालेल्या लढतीत महाराष्ट्राविरुद्ध अगोदरच्या लढतीत ५१ धावांत गारद झालेल्या गोव्याला यावेळी सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडल्याचे समाधान लाभले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गोव्याने ३७.१ षटकांत सर्वबाद १३८ धावा केल्या.

GOA vs UP
Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

हर्षिता हिने ९६ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या, पण तिला दुसऱ्या टोकाकडून अजिबात साथ मिळाली नाही. संचित सैल (१२) हिचा अपवाद वगळता गोव्याच्या एकाही बॅटरला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. उत्तर प्रदेशने विजयी लक्ष्य आरामात गाठताना २८.४ षटकांत ५ बाद १४२ धावा केल्या. गोव्याचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

GOA vs UP
Goa Drowning Death: शेजाऱ्याकडे ठेवला, खेळताना तळ्यात पडला; तळेबांद येथे दीड वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ३७.१ षटकांत सर्वबाद १३८ (हर्षिता यादव ७७, निखिला नाईक २, जोया मीर ८, अथश्री शिवारकर ७, प्रीती गावकर ०, उस्मा खान ३, संचिता सैल १२, प्राची निकम ०, अँजेल डिकॉस्ता ८, निधी गोवेकर नाबाद २, विधी भांडारे १, मनीषा चौधरी २-३७, खुशी त्यागी ३-१३, सिद्धी मिश्रा ३-१९) पराभूत वि. उत्तर प्रदेश ः २८.४ षटकांत ५ बाद १४२ (कात्यायणी २९, सान्वी भाटिया नाबाद ४२, खुशी त्यागी ३३, उस्मा खान ९-०-३०-२, अँजेल डिकॉस्ता ६.४-०-४१-२, निखिला नाईक २-०-१२-०, विधी भांडारे ४-०-२२-०, अथश्री शिवारकर ४-०-२०-०, प्राची निकम ३-०-१६-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com