Goa Drowning Death: शेजाऱ्याकडे ठेवला, खेळताना तळ्यात पडला; तळेबांद येथे दीड वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

Death: दीड वर्षीय बालकाला शेजाऱ्याकडे ठेवलेल्या पालकांना काही तासांतच आपल्या चिमुकल्याचा मृतदेह पाहावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडलीय.
Goa Drowning Death
Goa Drowning DeathDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कामावर निघताना आपल्या दीड वर्षीय बालकाला शेजाऱ्याकडे ठेवलेल्या पालकांना काही तासांतच आपल्या चिमुकल्याचा मृतदेह पाहावा लागल्याची हृदयद्रावक घटना तळेबांद, बाणावली येथे सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. इरहान शेख असे या बालकाचे नाव आहे.

घराच्या आवारात खेळत असताना जवळच्या तळ्यात पडून इरहानचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली. या प्रकरणाची नोंद अनैसर्गिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला होता.

Goa Drowning Death
Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरहानचे पालक हे मजूर असून तळेबांद परिसरात वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे ते कामावर जात होते, त्यांनी बालकाला शेजाऱ्याकडे ठेवले. या घराच्या पाठीमागे एक तळे आहे. दुपारी झोपेतून उठल्यानंतर हा बालक खेळता-खेळता तळ्याकडे गेला व त्यात पडून बुडाला.

Goa Drowning Death
Goa Rent-a-Car: 'निर्णय मागे घ्या' नाहीतर...! रेन्ट अ कार व्यावसायिकांची पणजीत धडक; वाहतूक खात्याच्या परवाना निर्णयाविरुद्ध संताप

बालक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. काही वेळानंतर इरहानचा मृतदेह तळ्यात आढळून आला. शवचिकित्सेनंतर बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, मृतदेह नंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

दरम्यान, पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल कृष्णा यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com