Ponda Table Tennis Tournament: फोंड्यात टेबल टेनिसचा थरार! 11 वर्षांखालील मुलींच्या उपांत्य फेरीत अनाया, शौर्या, त्विषाची दमदार एन्ट्री

Goa Table Tennis Tournament: स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात सुरू आहे.
Goa Table Tennis Tournament
Ponda Table Tennis TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फोंडा टेबल टेनिस स्पोर्टस क्लबतर्फे घेण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल गोवा प्रमुख मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत अनाया शुक्ला, शौर्या देसाई, त्विषा कोटकर, वनलाल्हरियापुई यांनी उपांत्य फेरी गाठली. स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात सुरू आहे.

उपांत्यपूर्व फेरीत अनाया हिने शनाझ शेख हिला, शौर्याने क्लेअर जॉर्ज हिला, त्विषाने ताशा मास्कारेन्हास हिला, तर वनलाल्हरियापुई हिने स्वरा गुडे हिला पराभूत केले. १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत साची देसाई, वनलाल्हरियातपुई, इनारा डिसोझा,

Goa Table Tennis Tournament
Goa Womens Cricket: गोव्याच्या पोरी जगात भारी! टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विजेतेपद; अंतिम लढतीत उत्तर प्रदेशला केले पराभूत

शौर्या देसाई, लालरुआतसांगी, वनलालरिनझुआली, अनाया शुक्ला, तिशा शेख यांनी पुढील फेरी गाठली. स्पर्धेच्या उद्‍घाटनास फोंड्याचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, भास्कर खांडेकर, आयोजन क्लबचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी, फोंड्याचे नगरसेवक शौनक बोरकर, आयोजन क्लबचे अमोघ नमशीकर यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com