Goa Cricket Association
Goa Cricket Association Dainik Gomantak

Goa Ranji Cricket: गोव्याला मिळणार नवा कर्णधार? रणजी संघाला नेतृत्वबदलाचे वेध; 15 ऑक्टोबरपासून एलिट गटाची मोहीम

Goa Ranji Cricket Captain: गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघाला नव्या कर्णधाराचे वेध लागले असून २०२५-२६ मोसमातील खडतर एलिट मोहीम संघ नेतृत्वबदलासह खेळू शकतो.
Published on

पणजी: गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघाला नव्या कर्णधाराचे वेध लागले असून २०२५-२६ मोसमातील खडतर एलिट मोहीम संघ नेतृत्वबदलासह खेळू शकतो. सलग तीन मोसम जबाबदारी पेललेल्या अष्टपैलू दर्शन मिसाळला पर्याय मिळण्याचे संकेत आहेत.

गोव्याची रणजी करंडक स्पर्धेत एलिट ब गटातील मोहीम १५ ऑक्टोबरपासून चंडीगडविरुद्धच्या लढतीने पर्वरीत सुरू होईल. त्यानंतर अनुक्रमे कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, सौराष्ट्र, महाराष्ट्र व केरळ या बलाढ्य संघाविरुद्ध गोव्याला खेळावे लागेल. मिलाप मेवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने मोसमपूर्व तयारीत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) डॉ (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

जीसीएतील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, लागोपाठ तीन मोसम संघाचे नेतृत्व केल्यानंतर डावखुरा अष्टपैलू दर्शन मिसाळ याच्या जागी नव्या कर्णधारास संधी देण्याचा विचार आहे. दर्शन सध्या ३३ वर्षांचा आहे.

पुढील तीन-चार वर्षांचा विचार करून तेवढ्या कालावधीत संघ बांधणीसह नेतृत्व करणारा खेळाडू जीसीएला हवा आहे. त्यादृष्टीने यंदा नेतृत्वबदल करण्यास संघटना इच्छुक आहे. कर्णधार गोलंदाज नसावा, तर अनुभवी फलंदाज असावा असे जीसीएला वाटत आहे.

Goa Cricket Association
U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

सगुण कामत जायबंदी झाल्यानंतर २०१७-१८ मध्ये दर्शनने गोव्याचे दोन सामन्यांत नेतृत्व केले होते, नंतर २०२२-२३ पासून तो संघाचा नियमित कर्णधार बनला. गतमोसमात अंतिम लढतीसह प्लेट विभागात सहाही सामने जिंकण्याची किमया गोव्याच्या संघाने साधली होती. एकंदरीत दर्शन कर्णधार असताना गोव्याने २२ पैकी ८ सामने जिंकले, ६ लढती अनिर्णित राहिल्या, तर ८ लढतीत पराभव पत्करावा लागला.

Goa Cricket Association
Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

स्नेहल कवठणकरचे नाव आघाडीवर

रणजी संघ कर्णधारपदासाठी सध्या अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर याचे नाव आघाडीवर असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. स्नेहल १९ ऑक्टोबरला ३० वर्षांचा होईल. ५९ प्रथम श्रेणी सामन्यांत मध्यफळीतील शैलीदार फलंदाजाने ४७.९८च्या सरासरीने ४१२७ धावा केल्या आहेत. गतमोसमात या अनुभवी फलंदाजाने सहा सामन्यांत १८९.८०च्या सरासरीने ९४९ धावा केल्या होत्या, यामध्ये एका त्रिशतकाचा व दोन द्विशतकांचा समावेश होता. स्नेहलने यापूर्वी रणजी करंडक स्पर्धेत २०२१-२२ मध्ये गोव्याचे एलिट गटात नेतृत्व केले होते, तेव्हा तीन सामन्यांत गोव्याची दोन पराभव व एक अनिर्णित अशी कामगिरी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com