Ranji Trophy Cricket: गोव्याच्या रणजी संघाची धुरा अभिनव तेजराणाकडे; शिवेंद्र भुजबळला पदार्पणाची संधी, ऋत्विकचे पुनरागमन

Goa Ranji Trophy Team: डावखुरा फलंदाज अभिनव तेजराणा याची अपेक्षेनुसार गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली, तो स्नेहल कवठणकर याच्याकडून सूत्रे हाती घेईल.
Goa Ranji Trophy Team
Ranji Trophy CricketDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: डावखुरा फलंदाज अभिनव तेजराणा याची अपेक्षेनुसार गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली, तो स्नेहल कवठणकर याच्याकडून सूत्रे हाती घेईल. एलिट अ गटातील गोव्याचा पहिला चार दिवसीय सामना रविवारपासून पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर बडोद्याविरुद्ध खेळला जाईल.

२५ वर्षीय अभिनवने गतमोसमात रणजी स्पर्धेत यशस्वी पदार्पण केले होते. ओमान दौऱ्यात, तसेच कर्नाटकातील स्पर्धेत आणि महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजी केलेला २३ वर्षीय यष्टिरक्षक शिवेंद्र भुजबळ १६ सदस्यीय संघातील नवा चेहरा आहे. मोसमपूर्व स्पर्धांत वेगवान गोलंदाजीत मेहनत घेत छाप पाडलेल्या ऋत्विक नाईक या पुनरागमनाची संधी मिळाली आहे.

Goa Ranji Trophy Team
Goa AI Residency Programme: गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार 'एआय'ची जोड; मांद्रेत 13 ते 29 ऑक्टोबरदरम्यान विनामूल्य निवासी कार्यक्रम

दुखापतीमुळे डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याची संघात निवड झालेली नाही. २०२५-२६ मोसमातील अखेरच्या दोन सामन्यांत संघात नसलेला ऑफस्पिनर मोहित रेडकर व वेगवान फेलिक्स आलेमाव यांचीही संघात निवड झाली आहे. ऋत्विक ऑक्टोबर २०२४ नंतर, तर फेलिक्स जानेवारी २०२५ नंतर रणजी सामना खेळलेला नाही.

गोव्याचा रणजी क्रिकेट संघ

अभिनव तेजराणा (कर्णधार), मंथन खुटकर, सुयश प्रभुदेसाई, ललित यादव, स्नेहल कवठणकर, शिवेंद्र भुजबळ, वासुकी कौशिक, शुभम तारी, ऋत्विक नाईक, दर्शन मिसाळ, यश कसवणकर, अमूल्य पांड्रेकर, दीपराज गावकर, राजशेखर हरिकांत, मोहित रेडकर, फेलिक्स आलेमाव.

Goa Ranji Trophy Team
Arz NGO Goa: महिला-मुलींच्या संरक्षणासाठी गोवा सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 'अर्ज' संस्थेला कल्याणकारी संस्थेचा दर्जा

पंड्या बंधूविना बडोदा गोव्यात

प्रमुख खेळाडू हार्दिक व कृणाल या पंड्या बंधूविना बडोद्याचा संघ गोव्याविरुद्ध खेळणार आहे. हार्दिक जायबंदी आहे, तर कृणाल ‘रेड बॉल’ क्रिकेटपासून दूर आहे. राजस्थान संघातून पुन्हा बडोदा संघात दाखल झालेला दीपक हूडा महत्त्वाचा खेळाडू असेल. शिवाय मूळ जम्मू-काश्मीरचा रसिक सालेम दार हा सुद्धा संघात आहे. बडोदा संघ : अतित शेठ (कर्णधार), शाश्वत रावत (उपकर्णधार), शिवालिक शर्मा, प्रियांशू मोलिया, मनन सोळंकी, दीपक हूडा, ध्रुव एन. पटेल, मितेश पटेल, महेश पिठिया, भार्गव भट, रसिक सालेम दार, राज लिंबानी, आर्यन चावडा, लक्षित तोक्षिया, अक्षय मोरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com