Goa Ranji Cricket Team: गोव्याच्या रणजी संघासाठी लवकरच नवा 'प्रशिक्षक', गतमोसमातील मिलाप मेवाडा अनुपलब्ध; नियुक्तीबाबत 'GCA'त विचारमंथन

Goa Ranji Coach Appointment: गोव्याच्या रणजी क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी लवकरच नवी नियुक्ती अपेक्षित आहे.
Goa Ranji Coach Appointment
Goa Ranji Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या रणजी क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी लवकरच नवी नियुक्ती अपेक्षित आहे. यासंदर्भात गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये (जीसीए) विचारमंथन सुरू असून प्रशिक्षकपदासाठी काही नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, गतमोसमातील गोव्याच्या सीनियर संघाचे प्रशिक्षक मिलाप मेवाडा यांनी आपल्या अनुपलब्धतेबाबत ‘जीसीए’ला अधिकृतपणे कळविल्यामुळे रणजी संघ प्रशिक्षकपद आता रिक्त झाले आहे.

आगामी मोसमापूर्वी ‘जीसीए’कडून रणजी संघासाठी नवा प्रशिक्षक नियुक्ती केला जाईल. काही नावांवर चर्चा झाली असून दीर्घकालीन नियोजनावर भर देत यावेळी प्रशिक्षक नियुक्तीस प्राधान्य मिळण्याचे संकेत आहेत. गोव्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची किमान बाद फेरी गाठावी हे लक्ष्य बाळगण्यात आले आहे.

Goa Ranji Coach Appointment
Goa Sport: स्वप्नील अस्नोडकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी; बीसीसीआयच्या मोहाली येथील ‘सीओई’ शिबिरासाठी प्रशिक्षकपदी नियुक्ती

गोव्याची रणजी करंडक एलिट अ गटातील मोहीम ११ ऑक्टोबरपासून सुरू होईल. सात सामन्यांपैकी चार सामने अवे, तर तीनलढती होम मैदानावर होतील. बडोदा, उत्तर प्रदेश,विदर्भ, बिहार, पुदुचेरी, मध्य प्रदेश, गतविजेता जम्मू-काश्मीरया मातब्बर संघांचे आव्हान आगामी मोसमात गोव्यासमोर आहे.

याव्यतिरिक्त नोव्हेंबरमध्ये गोव्याचा संघ सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात हैदराबाद, मुंबई, गुजरात, विदर्भ, ओडिशा, उत्तराखंड, छत्तीसगड या संघांविरुद्ध तर डिसेंबरमध्ये विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या एलिट क गटात पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड या संघांविरुद्ध खेळेल.

Goa Ranji Coach Appointment
Mayem Sport Ground : मयेत क्रीडा मैदानाचा कायापालट; आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते कामास प्रारंभ

२०२५-२६ मधील कामगिरी

गतमोसमातील रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या तीन लढतीत एक विजय व दोन अनिर्णित निकालांसह गोव्याने ११ गुणांसह मिलाप मेवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने सकारात्मक सुरवात केली. मात्र नंतर संघाची कामगिरी कमालीची घसरली आणि ओळीने चार पराभव पत्करावे लागले. विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेतील सात लढतीत गोव्याने तीन विजय नोंदविले, तर चार पराभव पत्करले. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत सातपैकी चार लढतींत गोव्याने विजय नोंदविले, तर तीन सामने गमावले.

पाच मोसम, पाच प्रशिक्षक

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय अष्टपैलू दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने २०२४-२५ मोसमातील प्लेट विभागात सहाही सामने जिंकून रणजी एलिट श्रेणीसाठी पुन्हा पात्रता मिळविली होती. मात्र मोंगिया यांचा कालावधी वाढू शकला नाही आणि २०२५-२६ साठी प्रशिक्षकपदी मिलाप मेवाडा यांची वर्णी लागली.

Goa Ranji Coach Appointment
World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

त्यापूर्वी, मुंबईचे विनोद राघवन यांच्या मार्गदर्शनाखाली सातपैकी पाच सामने गमावल्यामुळे गोव्याची २०२३-२४ मोसमात रणजी स्पर्धेच्या एलिटमधून प्लेट विभागात पदावनती झाली होती. २०२२-२३ मध्ये कर्नाटकचे मन्सूर अली खान यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने रणजी स्पर्धेत समाधानकारक कामगिरी बजावली होती, पण त्यांना मुदतवाढ मिळाली नाही. कोविडमुळे संक्षिप्त स्वरुपात झालेल्या २०२१-२२ मधील रणजी स्पर्धेत दिल्लीच्या के. भास्कर पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याचा संघ तीन रणजी सामने खेळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com