Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

Goa Ranji Trophy captain 2026: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या मोहिमेत गोव्याला नवा कर्णधार लाभू शकतो, तसे झाल्यास डावखुरा फलंदाज अभिनव तेजराणा याला पसंती असेल.
Abhinav Tejrana captaincy Goa Ranji team
Abhinav Tejrana Goa Ranji captainDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या मोहिमेत गोव्याला नवा कर्णधार लाभू शकतो, तसे झाल्यास डावखुरा फलंदाज अभिनव तेजराणा याला पसंती असेल. संघाचा एलिट अ गटातील पहिला सामना रविवारपासून (ता. ११) बडोद्याविरुद्ध कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळला जाईल.

मोसमपूर्व स्पर्धांत गोव्याचा संघ मागील काही सामन्यांत अभिनवच्या नेतृत्वाखाली खेळला होता. या डावखुऱ्या २५ वर्षीय फलंदाजाने गतमोसमात पदार्पण करताना सात सामन्यांत ७८८ धावा केल्या होत्या.

यंदा ओमान दौऱ्यात, तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातील स्पर्धेतही त्याने फलंदाजीतील फॉर्म कायम राखला होता. अभिनवची कर्णधारपदी निवड झाल्यास तो गतमोसमातील कर्णधार स्नेहल कवठणकर याची जागा घेईल. तसे झाल्यास ३० वर्षीय अनुभवी स्नेहल संघातील प्रमुख फलंदाज या नात्याने खेळेल.

Abhinav Tejrana captaincy Goa Ranji team
Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

गतमोसमात रणजी करंडक स्पर्धेत चंडीगडविरुद्ध पहिल्या सामन्यात विजय नोंदविताना दीपराज गावकर याने गोव्याचे नेतृत्व केले होते. त्यानंतर स्नेहल कवठणकर संघात परतल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली गोव्याने दोन अनिर्णित व सलग चार पराभव अशी कामगिरी साधली होती.

पहिल्या सामन्यासाठी गोव्याचा संघ १५ अथवा १६ सदस्यीय असल्यास मोठे बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. ललित यादव, वासुकी कौशिक आणि अर्जुन तेंडुलकर हे संघातील पाहुणे क्रिकेटपटू आहेत. युवा खेळाडू यश कसवणकर याची कामगिरी गोव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. सराव स्पर्धांत उल्लेखनीय ठरलेला वेगवान ऋत्विक नाईक संघात आल्यास नवल वाटू नये.

Abhinav Tejrana captaincy Goa Ranji team
Goa Ujjwala Scheme: उज्ज्वला योजनेचा लाभ 75 हजारांपर्यंत पोहोचला, पण 1 लाख अर्जांचा खोळंबा; नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया लांबण्याची शक्यता

यष्टिरक्षकांत शिवेंद्र आघाडीवर

ओमान, कर्नाटक व महाराष्ट्र दौऱ्यात २३ वर्षीय शिवेंद्र भुजबळ याने सातत्यपूर्ण फलंदाजी केली, त्यामुळे संघ निवडीत त्याला प्राधान्यक्रम मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरा यष्टिरक्षक निवडायचा असल्यास राजशेखर हरिकांत व पियुष यादव यांच्यात चढाओढ असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.